• Sat. Sep 21st, 2024
अल्पवयीन मुलाचं अपहरण, पालकांकडून २५ लाखांची मागणी, पोलिसांना कळताच चिमुकल्याची हत्या

ठाणे : रविवारी नियमाने नमाज अदा करण्यासाठी गेलेल्या चिमुकल्या इबादचे अपहरण झाले होते. यानंतर इबादच्या पालकांकडून खंडणीची मागणी केली जाते. यावर इबादच्या घरुन लागलीच पोलिसांना खबर मिळते. पोलीस तपासासाठी येणार याची चाहूल लागताच पकडले जाऊ या भीती पोटी चिमुकल्याची हत्या करुन त्याचा मृतदेह पोत्यात टाकून लपवण्यात येतो. असा नाट्यमय आणि धक्कादायक हत्येचा प्रकार बदलापूर – वांगणी या दोन शहरांच्यामध्ये असलेल्या गोरेगाव या परिसरात घडला. या प्रकरणी कुळगांव ग्रामीण पोलिसांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावून संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र, या घटनेनं गोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.मुदासिर बुबेरे राहणार वांगणी यांचा याच परिसरात टेलरिंगचा छोटासा व्यवसाय आहे. त्यांचा ९ वर्षीय मुलगा इबाद हा इयत्ता ४थीत शिकत आहे. रमजानचा महिना सुरु असल्याने इबाद हा नियमाप्रमाणे सायंकाळी नमाज अदा करण्यासाठी गेला होता. मात्र, रात्र झाली तरी देखील तो घरी आला नाही. रात्रीचे ९ वाजून गेले तरी इबाद घरी आला नाही म्हणून त्याच्या घरच्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोधाशोध सुरु केली.
काँग्रेसच्या महिला नेत्याची जीभ घसरली, ट्विट डिलीट केलं पण कंगना रणौतच्या उत्तराची चर्चा

यादरम्यान इबादच्या पालकांना एक निनावी फोन येऊन २५ लाखांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. घाबरलेल्या इबादच्या पालकांनी याबाबत कुळगांव ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. यावर जिल्हा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डी.एस.स्वामी यांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या पोलीस पथकाने गोरेगाव परिसरात रात्री उशीरापर्यंत तपास केला. यावेळी पोलिसांना शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांच्या घरामागच्या बाजूला असलेल्या एका पोत्यात इबादचा मृतदेह आढळून आला.

पुढील तपास करत असताना काही गोष्टींचा संशय येऊन, लगेचच यावर पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून शेजारील घरातल्या काही संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून इबादचा मृतदेह शविच्छेदनासाठी जे.जे रुग्णालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती दिली. यावेळी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत पुढील तपास सुरु असून हा गुन्हा का घडला? आरोपींनी इतक्या निर्दयपणे चिमुकल्या इबादची हत्या का केली? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed