सुशीलकुमार शिंदे यांनी करमाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी ते उपरे नव्हते का? शरद पवार यांनी बारामती येथून येऊन माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती आणि जनतेने सुशीलकुमार शिंदे आणि शरद पवारांना निवडून देखील दिले होते. त्यावेळी ते उपरे नव्हते का? असा उपरोधिक टोला राम सातपुते यांनी लगावला आहे.
सालगडी म्हणून सोलापूरची सेवा करेन
भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राम सातपुते यांचं सोमवारी सायंकाळी जोरदार स्वागत करण्यात आलं. बाहेरील उमेदवार पुन्हा एकदा सोलापूरला मिळाला असा प्रश्न विचारताच राम सातपुते यांनी सोलापुरात ऊसतोड कामगार म्हणून काम केल्याचे सांगत सोलापूरच्या विविध साखर कारखान्याशी निगडित मी ऊसतोड केली आहे. माझ्या आई वडिलांनी या सोलापुरात सालगडी म्हणून काम केलं आणि मी देखील जनतेच सालगडी म्हणून सेवा करेन, अशी ग्वाही राम सातपुते यांनी दिली.
भाजपची १११ उमेदवारांची पाचवी यादी, महाराष्ट्रातील तीन जागांचा समावेश
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने १११ उमेदवारांची पाचवी यादी रविवारी जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील सोलापूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या तीन जागांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या यादीत सुनील बाबूराव मेढे यांना भंडारा-गोंदिया मतदार संघातून, अशोक महादेवराव नेते यांना गडचिरोली-चिमूरमधून, तर राम सातपुते यांना सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.