• Sat. Sep 21st, 2024
नाशिक पुण्यानंतर आता सांगलीचा नंबर, मुंबई गुन्हे शाखेच्या हाती घबाड, निर्मनुष्य ठिकाणी…

स्वप्निल एरंडोलकर, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळमधील इरळी गावामध्ये मुंबई गुन्हे शाखेने धाड टाकत २४५ कोटी रुपयांचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने सहा संशयितांना ताब्यात घेतले आहे.

मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यात असून तो गेल्या १७ वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मुख्य संशयित एमडी ड्रग्जची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली होती. एमडी ड्रग्ज साखळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक करण्यात आले आहे.
भीती कुणाची कशाला? शहरात ‘एमडी’ची तोलूनमापून विक्री, कॉलेजच्या गेटवरच थाटलेलं दुकान

संशयितांनी सांगलीच्या इरळी या गावामध्ये अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या एका खोलीमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटला होता. सांगली जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्जची ही सर्वात मोठी दुसरी कारवाई आहे. यापूर्वी कुपवाडमध्ये तीनशे कोटी रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. आता पुन्हा सांगली जिल्ह्यातीलच इरळी गावामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
पार्ट्या न् ‘फास्ट मनी’चा मोह; मुंबईत नशेच्या दुनियेची भुरळ, ललित पाटील ड्रग्जमाफिया कसा बनला?

नाशिक, मुंबई, पुणे आणि त्यानंतर सांगलीतील कुपवाडमध्ये मोठी कारवाई करत ३०० कोटी रुपयांचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. त्यानंतर मुंबई पुणे शाखेने सांगलीतील इरळीत कारवाई केली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा पुन्हा एकदा ड्रग्ज रॅकेटमध्ये सक्रिय असल्याचे समोर आले. केळी गावातील ड्रग्ज बनवणारा कारखाना हा अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी होता. त्यामुळे याची पुसटशी कल्पना देखील सांगली पोलिसांना नव्हती. मुंबई पुणे शाखेने अत्यंत गोपनीयता पाळत या ठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed