• Tue. Sep 15th, 2026
चारित्र्यावर संशय, दारुच्या नशेत पोटच्या लेकींसह बायकोला पेटवलं, क्षणात संसाराची राखरांगोळी

प्रियांका पाटील, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बापाने पोटच्या लेकीसह पत्नीला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याचा धक्कादायर प्रकार उघडकीस आला आहे. या नराधमाने एकाच वेळी तिघांना जिवंत जाळलं आहे. यात महिला आणि तिच्या दोन मुलींचा नाहक बळी गेला आहे. एका संशमुळे आख्खा संसार उद्ध्वस्त झाला आहे. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे ही हृदयद्रावक घटना घडली.गावातील लांगडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सुनील लांडगे या इसमाने याने त्याची पत्नी लिलाबाई आणि दोन मुली यांच्या अंगावर रॉकेल टाकून घरातच जिवंत जाळल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास घडली आहे. या घटनेनं परिसरात तसेच तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपीविरुद्ध नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. आरोपीने है निर्दयी कृत्य संशयाच्या कारणाने आणि दारूच्या नशेत केल्याची चर्चा आहे. दरम्यान दारूच्या नशेत असलेला आरोपी सुनील लांडगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबईत जन्म, नागपूरच्या भोसले घराण्याचे दत्तक, याज्ञसेनीराजेंशी विवाह, शाहू छत्रपतींविषयी कधीही न वाचलेली माहिती

या घटनेत त्याची पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी व खुशी या तिघांचा जळून मृत्यू झाला आहे. ज्या घरात ही घटना घडली आहे, ते घर पत्र्याचे होते. ते घर जळून खाक झाले आहे. आधीच उन्हाचा तडाखा व भडकलेली आग, तापलेले पत्रे यामुळे मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागत होते. मात्र, दुपारपर्यंत हे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदन साठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहेत. नगर तालुका पोलीस घटनेचा सखोल तपास करत आहेत.
Marathwada Rain Update : दोन दिवस धो-धो बरसला, पण पुन्हा विश्रांती, मराठवाड्यात शेतकऱ्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा; हवामान विभागाचा धडकी भरवणारा अंदाज
Pune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?
Manoj Jarange Patil : ‘मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, पण काही गोष्टी शक्य नाही’; CM फडणवीसांचं मोठं विधान, मनोज जरागेंचं मुंबईकडे प्रस्थान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed