Marathwada Rain News : मराठवाडा विभागात अद्यापही जोरदार पावसाची अपेक्षा आहे. दोन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत.
जोरदार पावसाची शक्यता नाही
मराठवाड्यात दीर्घ खंडानंतर पावसाने हजेरी लावल्यामुळे दिलासा मिळाला होता. राज्यातील इतर भागातही पावसाला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस सुरू आहे. मराठवाडा विभागात दोन दिवस हजेरी लावल्यानंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. विभागातील एकाही जिल्ह्यात पुढील पाच दिवस म्हणजे १८ सप्टेंबरपर्यंत जोरदार पावसाची शक्यता नाही. तुरळक पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात रविवारी पाऊस झाला. शहर परिसरात १०.६ मिमी पाऊस झाल्याची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली आहे. पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव तालुक्यात पाऊस झाला नाही. वैजापूर, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे.
Pune Metro: पुणेकरांकडून गणेशोत्सवात तुफान गर्दी; मेट्रोकडून आता विशेष वेळापत्रक, रात्री किती वाजेपर्यंत धावणार गाड्या?
जिल्हानिहाय पाऊस कसा?
दरम्यान, विभागात गेल्या २४ तासांत ५.५ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक १५.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर ५.७, जालना ८.४, बीड ०.४, लातूर ४.४, धाराशिव १.२, परभणी ०.७ आणि हिंगोली १.७ मिमी असा जिल्हानिहाय पाऊस झाला आहे.
दुष्काळ जाहीर करा
मराठवाड्यात पावसाने महिन्याहून अधिक काळ ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडला असून पिके पूर्णपणे करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १३ सप्टेंबर रोजी ‘मराठवाड्याचा विकास तुमसे ना हो पायेगा’ जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी सरकारवर कडाडून टीका केली.
Manoj Jarange Patil : ‘मराठा आंदोलकांच्या मागण्या मान्य, पण काही गोष्टी शक्य नाही’; CM फडणवीसांचं मोठं विधान, मनोज जरागेंचं मुंबईकडे प्रस्थान
केवळ पोकळ घोषणा
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केवळ पोकळ घोषणा केल्या जातात, मात्र प्रत्यक्षात सिंचन, आरोग्य व शिक्षणाचा अनुशेष कायम असल्याचा आरोप त्यांनी केला. जिल्ह्यात पावसाच्या खंडामुळे मोठे नुकसान झाले असून दुष्काळी उपाययोजनांची तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी त्यांनी लावून धरली. आरक्षण प्रश्नावरून सरकार मराठा व धनगर समाजाकडे केवळ मतपेटी म्हणूनच पाहत असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
विविध मागण्यांचे निवेदन
जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार डॉ. राहुल पाटील, माजी आमदार मीरा रेंगे, महापौर सय्यद इकबाल, डॉ. विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, विष्णू मुरकुटे, अंबिका डहाळे, माजूलाला, अरविंद देशमुख, शिवलिंग बोधणे, प्रभू जयस्वाल आदी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परभणीतील समांतर पाणीपुरवठा, शासकीय रुग्णालय, सिंचन प्रकल्प, रेल्वे दुहेरीकरण व जिंतूर बायपास यांसारख्या रखडलेल्या कामांचा जाब विचारत, हक्काचा विकास निधी मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, असा इशारा आमदार दानवे, डॉ.पाटील आणि आंदोलकांनी दिला.
