• Mon. Nov 25th, 2024
    तुकाराम बीजनिमित्त पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून वाहतुकीत बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

    पिंपरी: श्रीक्षेत्र देहू येथे तुकाराम बीज सोहळा साजरा करण्यात येणार आहे. या बीज सोहळ्याला राज्यभरातून भाविक उपस्थितीती लावत असतात. अनेकजण कुटुंबासह येथे दर्शनासाठी येत असल्याने वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळते. त्यामुळे देहू येथे मोठी वाहतूक कोंडी होते. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत.

    काय असतील बदल :

    -देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायवे) येथून देहुगावकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंदी करण्यात येत आहे.

    – महिंद्रा सर्कलकडून फिजित्सू कॉर्नर अथवा कॅनबे चौक/आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी.

    -पर्यायी मार्ग महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मागें डायमंड चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

    -तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगाव जाणारे रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे.

    पर्यायी मार्ग काय असतील :

    – या मार्गावरील वाहने हि मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

    – या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल- indurance चौक एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.

    – देहू कमान ते 14 टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद, खंडेलवाल चौक ते देहू कमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारचे वाहनांसाठी बंद.

    – जुना पालखी मार्ग (कंद पाटील2 लोक चौक) ते झेंडे मळा (जकात नाका) जाणारी वाहतूक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यांत येत आहे.

    हा बदल आज सोमावरपासून ते बुधवारी रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात आला आहे. यावेळेत फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सर्व वाहनांसाठी वाहतूक बंद राहील, याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed