• Sat. Mar 14th, 2026
    LPG Gas Shortage: गॅसटंचाईची धग अधिवेशनाला; आमदारांचे कँटीन बंद, सरकारने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

    LPG Gas Shortage: विजय वडेट्टीवार यांनी कामकाज सुरू झाल्याबरोबरच औचित्याचा प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले की, ‘राज्यात सध्या घरगुती गॅसचा प्रचंड तुटवडा असून, गृहिणींमध्ये भीती आणि अस्वस्थतेचे वातावरण आहे.

    गॅसटंचाईची धग अधिवेशनाला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाला असून त्याचे पडसाद बुधवारी विधानसभेच्या कामकाजात उमटले. काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते विजय वडेट्टीवार यांनी याप्रश्नी सरकारने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली. तर याप्रश्नी सरकारने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले.

    एकीकडे सरकार विकासाच्या गप्पा मारत असताना दुसरीकडे जनतेला आपली चूल कशी पेटवायची, याची चिंता सतावत आहे. सरकारने या गंभीर परिस्थितीवर तात्काळ आपली भूमिका स्पष्ट करावी’.

    Maharashtra TimesPrakash Ambedkar : ‘सब चंगा सी’चा दावा फोल, पेट्रोलियम क्षेत्रावर ‘एस्मा’ का?’; गॅस तुटवड्यावरुन प्रकाश आंबेडकरांची मोदी सरकारवर टीका
    अधिवेशनाच्या मंगळवारच्या कामकाजादरम्यान गॅस तुटवड्याचा फटका आमदारांना बसल्याचे दिसून आले. मंगळवारचे कामकाज रात्री एक वाजेपर्यंत सुरू असताना कँटिन बंद होते. मुंबई आणि नागपूरमधील सुमारे ३० टक्के हॉटेल्स गॅस तुटवड्यामुळे बंद ठेवली आहेत. याचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

    १८ लाखांची सिलिंडरची गाडी चोरीला
    गॅसच्या तुटवड्यामुळे मंगळवारी १८ लाख रुपयांच्या सिलिंडरची गाडी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. ही कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने भयावह स्थिती आहे. गॅस टंचाईच्या निषेधार्थ कोल्हापूर आणि विदर्भासह राज्यभरात आंदोलने सुरू झाली आहेत. महिला भगिनींमध्ये चिंतेचे वातावरण आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
    Maharashtra TimesMumbai Child Assault Cases: लहान मुलांसाठी मुंबई असुरक्षित? 2023मध्ये सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद, मुख्यमंत्र्यांनी सांगितली आकडेवारी
    काँग्रेसचे आज राज्यभर आंदोलन

    सिलिंडरच्या दरवाढीविरोधात काँग्रेसतर्फे आज, गुरुवारी राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. केंद्र सरकारने ही दरवाढ तत्काळ मागे घ्यावी आणि घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावेत, या मागणीसाठी हे आंदोलन केले जाणार असल्याचे पक्षातर्फे जाहीर करण्यात आले आहे. गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यावसायिक यांना गॅस उपलब्ध होत नाही. आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा