• Thu. Mar 12th, 2026
    Eknath Khadse: एकनाथ खडसे अडचणीत! मुक्ताईनगर जमीन व्यवहारप्रकरण अंगलट, महसूलमंत्र्यांचे थेट SIT चौकशीचे आदेश

    Eknath Khadse: महसूलमंत्री बावनकुळे यांनी एकनाथ खडसे यांच्याविरोधातील एका जमीन व्यवहार प्रकरणाची एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. काय आहे हे प्रकरण?

    एकनाथ खडसे(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
    म. टा. प्रतिनिधी, जळगाव : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खडसे यांच्याविरोधात ‘एसआयटी’ नेमण्याचे आदेश दिले आहेत. या चौकशीसाठी सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार आहेत. संबंधित प्रकरण नऊ गावांतील जमिनींशी जोडलेले असल्याचे सांगितले जात आहे.

    भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी केलेल्या आरोपानुसार मुक्ताईनगर येथे राष्ट्रीय महामार्ग विस्तारीकरण सुरू आहे. २५ जानेवारी २०२२ मध्ये या संदर्भात राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. यासाठी ५६.८० हेक्टर जमिन भूसंपादन करण्याचा निर्णय सरकारने १३ जानेवारी २०२३ ला घेतला होता. मोठा मोबदला लाटण्यासाठी एकनाथ खडसे यांनी १४ दिवसांनी २७ जानेवारी २०२३ रोजी अधिसूचित झालेल्या जमिनीपैकी काही जमीन खरेदी केली असल्याचा आरोप मंगेश चव्हाण यांनी केला आहे.

    Maharashtra TimesManoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचं कुणबी आरक्षणासाठी मराठा समाजाला आवाहन, आमदारांना जाब विचारण्याची सूचना
    पंधरा लाख २२ हजार रुपयांचे खरेदीखत दाखवले. साडेतीन वर्षांनंतर त्यांच्या लाभात हस्तांतरण केले. खरेदी आधी तिथे झाडे लावली. या मोबदल्यासाठी पाठपुरावा सुरू केला. ही शासनाची फसवणूक असल्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटले आहे.

    Maharashtra TimesRaigad News : सस्पेन्स संपला, रायगडमध्ये महायुतीचं जुळलं, अखेर तीनही पक्ष एकत्र, ZP अध्यक्ष भाजपचा होणार, काय-काय घडलं?
    महसूलमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

    या प्रकरणात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एसआयटी चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन केली जाणार आहे. या पथकाला तीन महिन्यांच्या आत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या तपासात सहा विभागांतील अधिकारी सहभागी होणार आहेत. संबंधित अहवाल सभागृहात मांडण्यात येणार असल्याचेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये ३ वर्षांपासून कन्सल्टंट म्हणून कार्यरत आहे.या आधी सकाळ मिडियामध्ये २ वर्ष कामाचा अनुभव आहे. चालू घडामोडी, गुन्हेगारी, राजकीय विषयांच्या बातम्यांत विशेष आवड.… आणखी वाचा