• Mon. Nov 25th, 2024

    नागपूर विद्यापीठ ठरले सुवर्णपदकाचे मानकरी, कायाकिंग स्पर्धेत मुलींच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी

    नागपूर विद्यापीठ ठरले सुवर्णपदकाचे मानकरी, कायाकिंग स्पर्धेत मुलींच्या संघाची नेत्रदीपक कामगिरी

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : पंजाबी विद्यापीठाच्या यजमानपदाखाली रुपनगर येथे घेण्यात आलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिलांच्या कॅनाइंग-कायाकिंग स्पर्धेत दमदार कामगिरी करीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संघाने सुवर्णपदक पटकावले.स्पर्धेत कायाकिंग प्रकारात ४ बाय २०० मीटर प्रकारात अव्वल स्थान मिळवित सुवर्ण पदक आपल्या नावे केले. या स्पर्धेत प्रथमच नागपूर विद्यापीठ मुलींच्या संघाने सुवर्ण पदक मिळवित नेत्रदीपक यश मिळविले. रौप्यपदक केरळ तर कांस्यपदक शिवाजी विद्यापीठाने प्राप्त केले. नागपूर विद्यापीठाच्या महिला संघात पूजा बेंडेवार, मुस्कान उके, वैष्णवी अजबाले आणि संजना कंगाले(सर्व आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, जवाहरनगर) यांचा समावेश होता.
    कापूस, तुरीचे दर कडाडले, ९ हजारांचा उच्चांक गाठणार?
    याशिवाय स्पर्धेत पाचशे मीटर ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप प्रकारात नागपूरच्या महिला संघाने रौप्यपदक पटकाविले. या प्रकारात नागपूर विद्यापीठ संघाने २ मिनिटे १३.०६ अशी वेळ नोंदवली. प्रथम स्थान पटियालाच्या पंजाबी विद्यापीठाने तर तिसरे स्थान चंडीगडच्या पंजाब विद्यापीठाने मिळविले. नागपूर विद्यापीठाच्या विजयी संघात आचल भुरे(एनपीडब्ल्यू कॉलेज-लाखनी), संजना कंगाले, मुस्कान उके, वैष्णवी अजबाले, मयुरी साठवणे, सबिना लांडगे(सर्व आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जवाहरनगर), रुपाली तांगळे (राजकमला तिडके कॉलेज, मौदा), प्रणाली तरारे(आठवले कॉलेज-भंडारा), रुची वालदे, मेघा सोरते(एमबी पटेल कॉलेज, साकोली), सुहानी कंगाले(जेएम पटेल कॉलेज), पूजा बुरडे(एसएन मोर कॉलेज,तुमसर) यांचा समावेश होता. प्रशिक्षक डॉ. रोमी बिश्त, डॉ. चंद्रमोहन सिंग यांच्या नेतृत्वात नागपूर विद्यापीठ महिला संघाने हे यश प्राप्त केले आहे. विजयी संघाची निवड डॉ. बी. एस. पवार यांच्या अध्यक्षतेत डॉ. अमित टेंभुर्णे, डॉ. चंद्रमोहन सिंग, डॉ. सुधीर सहारे, डॉ. रोमी बिश्त यांनी केली.

    महिला संघाने केलेल्या दमदार कामगिरीबद्दल विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद सूर्यवंशी यांनी आनंद व्यक्त केला आहे. भंडारा जिल्ह्यातील नदीत सराव करीत मुलींनी हे यश प्राप्त केल्याचा विशेष आनंद असल्याची प्रतिक्रिया डॉ. शरद सूर्यवंशी यांनी दिली. नागपूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ. प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आदींनी विजयी संघाचे कौतुक केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *