राज ठाकरेंनी दिल्लीत जाऊन अमित शहांसोबत ४० मिनिटं चर्चा केली. त्यानंतर राज मुंबईत परतले. ताज लँड्स एन्डमध्ये राज यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. मनसे आणि शिवसेनेचे विलिनीकरण करुन शिवसेनेचे अध्यक्षपद तुम्ही घ्या, अन्यथा लोकसभेला पाठिंबा द्या, त्याबदल्यात विधानसभेला सन्मानजनक जागा घ्या किंवा मग लोकसभेला एक-दोन जागा घ्या, पण मग विधानसभेला कमी जागा मिळतील, असे तीन प्रस्ताव राज यांना शिवसेना, भाजपकडून देण्यात आल्याचं वृत्त ‘लोकमत’नं
राज ठाकरे आणि भाजप, शिवसेनेत सुरू असलेल्या चर्चा बऱ्याच व्यापक असल्याचं समजतं. लोकसभा निवडणुकीत मनसेला किती जागा द्यायच्या इतक्यापुरतीच ही चर्चा मर्यादित नाही. राज यांना महायुतीसोबत कसं आणता येईल, त्यांना दीर्घकाळासाठी सोबत कसं ठेवता येईल या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. त्याच अनुषंगानं राज यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. पण याबद्दल शिंदे, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यापैकी कोणीही माध्यमांसमोर कोणीही स्पष्टपणे बोलायला तयार नाही.
शिंदे-राज यांची केमिस्ट्री, ठाकरेंना थेट टक्कर
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात शिवसेना आणि मनसे यांचं विलिनीकरण हा विषय दोन ते तीन बैठकांमध्ये चर्चेचा विषय होता. त्याबद्दल राज यांनी कोणतंही आश्वासन दिलेलं नाही. ते या प्रस्तावाबद्दल अनुकूल नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेला सह द्यायचा असल्यास शिंदे-राज यांनी एकत्र यायला हवं. तसं झाल्यास ठाकरेंसाठी मोठं आव्हान निर्माण होईल, अशी सूचना भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वानं केली आहे. राज यांची मनसे महायुतीत गेल्यास ठाकरेंना एनडीएचे दरवाजे कायमचे बंद होतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.