• Mon. Nov 25th, 2024
    मराठा आरक्षण : दहावीच्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल, दोन पेपर राहिले असतानाच नको ते कृत्य

    परभणी, प्रतिनिधी : दहावीच्या बोर्डाचे दोन पेपर आणखी शिल्लक होते परंतु सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी होत नसल्या कारणाने दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करणाऱ्या १६ वर्षीय युवकाचे नाव स्वराज मुंजाजी कुरे असून तो पूर्णा येथे आपल्या विधवा आईसह राहत होता. सध्या तो दहावीच्या वर्गात असून त्याचे दोन पेपर अद्यापही शिल्लक होते. पूर्णा तालुक्यातील मराठा आरक्षणाचा हा दुसरा बळी असून या आधी लोणधार येथील एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली होती.

    याविषयी सविस्तर वृत्त असे की, खुजडा येथील स्वराज मुंजाजी कुऱ्हे (वय १६)हा आपल्या विधवा आईसह शिक्षणासाठी मागील काही दिवसापासून पूर्णा शहराच्या आनंदनगर येथे खोली भाड्याने घेऊन वास्तव्यास होता. मयत स्वराजचे वडिल मुंजाजी कुऱ्हे यांचा आठ वर्षाआधी मोटारसायकल अपघातात मृत्यू झाल्याने त्याचे पितृछत्र हरवले होते. आई हिच त्याची आधार होती. त्यामुळे मुलाचे शिक्षण चांगले व्हावे यासाठी स्वराजची विधवा आई सरिता, आजी व एक गतिमंद भाऊ असा परिवार घेऊन शिक्षणासाठी पूर्णा शहरातील आनंद नगरात भाड्याने खोली करुन राहत असे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने विधवा आई वडिलोपार्जित केवळ दीड एकर शेती कसून मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होती.
    मराठा आरक्षणामुळे आणखी एकाने उचललं टोकाचं पाऊल, बापाला सोडायला गेला पुन्हा परतलाच नाही…

    स्वराज हा शिक्षणात हुशार असल्याने त्याला शिकण्याची इच्छाशक्ती होती. परंतु परिस्थिती हालाखीची, त्यात समजाला आरक्षण मिळत नव्हते. दहावीच्या परीक्षेचे पेपर सुरु असताना तो नेहमी समाजाला आरक्षण मिळत नाही, म्हणून चिंतेत होता. त्याची आई, नातेवाईकही त्याची समजूत काढत असत. शेवटी दहावीच्या परीक्षेचे दोन पेपर शिल्लक असतानाच स्वराजने गुरुवारी २१ मार्च रोजी दुपारच्या वेळी टोकाचा निर्णय घेत घरी कुणी नसल्याचा फायदा घेऊन गळफास लावून आत्महत्या केली.

    आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबाग फुलवली, कलिंगडाला थेट पश्चिम बंगालमधून मागणी


    सायंकाळी उशिरापर्यंत घरी कुणीच नसताना दरवाजा आतून कसा काय बंद आहे हा संशय आल्याने शेजारच्या व्यक्तींनी खिडकीवर चढून पाहिले असता स्वराजचा गळफास लावलेला मृतदेह आढळला. ही माहिती पूर्णा पोलिसांना कळवण्यात आली. सपोनि नांदगावकर, जमादार रमेश मुजमुले, पोकॉ. अजय माळकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करून ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करुन नातेवाईकास स्वाधीन केल्यानंतर त्याच्या पार्थिव देहावर खुजडा येथे रात्री ११ वाजता गावक-यांनी जड अंतःकरणाने अंत्यसंस्कार केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *