• Sat. Sep 21st, 2024

रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत संभ्रम; जागेवर दोन्ही पक्षाचा दावा, महायुतीचा उमेदवार कोण?

रामटेक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराबाबत संभ्रम; जागेवर दोन्ही पक्षाचा दावा, महायुतीचा उमेदवार कोण?

नागपूर: केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली. तर निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांनी अर्ज भरण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. मात्र, महायुतीला अद्याप रामटेक जागेसाठी उमेदवाराचे नाव निवडता आलेले नाही.
बुलढाण्यात महायुतीत फूट; उमेदवारी जाहीर होण्याआधीच भाजप पदाधिकारी नाराज, शिंदे गटावर थेट आरोप
भाजप आणि शिवसेना यांच्यातील लोकसभेच्या जागांच्या विभाजनानुसार नागपूर भाजपकडेच राहणार असून शिवसेना रामटेक लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार उभा करणार आहे. गेल्या दोन निवडणुकीत येथून शिवसेनेचे कृपाल तुमाने हे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले आहे. २०१४मध्ये तुमाने यांनी तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते मुकुल वासनिक यांचा पराभव केला होता. तर २०१९मध्ये काँग्रेसचे उमेदवार किशोर गजभिये यांचा पराभव करून ते सलग दुसऱ्यांदा खासदार झाले. मात्र २०२४ मध्ये परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत. एक गट उद्धव यांच्यासोबत आहे, तर दुसरा गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. सध्या रामटेकचे खासदार तुमाने शिंदे गटात आहे.लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी झाली असली तरी महायुतीच्या रामटेक लोकसभा जागेबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. रामटेक लोकसभा जागेवर भारतीय जनता पक्ष सातत्याने दावा करत आहे. भाजपचे म्हणणे आहे की या भागात त्यांचे संघटन खूप मजबूत आहे. त्यामुळे शिवसेनेने त्यांना ही जागा द्यावी. खासदार कृपाल तुमाने हे रामटेक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून भाजपची नजर अजूनही आमदार राजू पारवे यांच्यावर आहे. याबाबत विविध अधिकाऱ्यांची दूरध्वनीवरून चौकशी केली जात आहे. रामटेकची कोंडी अजूनही कायम आहे. शिंदेसेना रामटेकवरील आपला दावा सोडायला तयार नाही. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर मुख्यमंत्री शिंदे यांना मोठे मन दाखवण्याचे आवाहन केले आहे.

ना पद, ना उमेदवारी, वेगळी भूमिका घ्या; रामराजेंकडे भर मंचावर कार्यकर्त्याची मागणी

भाजपकडून रामटेक लोकसभा जागेवर संघटन मजबूत असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र मुख्यमंत्री शिंदे जागा सोडायला तयार नाहीत. ज्या जागांवर शिवसेनेची मजबूत स्थिती आहे. त्यात रामटेक लोकसभा मतदारसंघाचा समावेश असल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. दोन्ही पक्षांमधील दाव्यामुळे अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. अधिसूचना जारी केल्यानंतर, उमेदवाराने सात दिवसांच्या आत नामांकन दाखल करणे आवश्यक आहे. मात्र, आता रामटेक लोकसभेची जागा कोणाच्या कोट्यात जाते आणि येथून कृपाल तुमाने यांना तिसरी संधी मिळते की नव्या चेहऱ्यावर बाजी मारली जाते हे पाहावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed