पुणे : पुणे लोकसभा निवडणूक सध्या चर्चेचा विषय बनली आहे. भाजपने मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिल्यानंतर आता काँग्रेसकडून कसब्यात जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवण्यातं आलं आहे. काल रात्री उशिरा काँग्रेसने महाराष्ट्रातली पहिली यादी जाहीर केली असून त्यात रवींद्र धंगेकर यांना पुणे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात सरळ लढत ही मुरलीधर मोहोळ विरुद्ध रविंद्र धंगेकर अशीच होणार आहे. पुण्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पुण्यात प्रचाराला जोर आला आहे.कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता प्रचाराला सुरूवात झाली आहे. अनेक नेत्यांच्या आता गाठीभेटी सुरू झाल्या आहेत. यातच दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यासोबत असलेला रवींद्र धंगेकर यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोवर जो आमदार कसब्याचा, तोच खासदार पुण्याचा, मी पुणेकर, असं म्हटलंय. त्यावरून आता भाजप आणि कॉंग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. हा फोटो नेमका कोणी बनवला याची पुष्टी झाली नसली तरी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून हा फोटो व्हायरल करण्यात येत आहे.
रविंद्र धंगेकर यांच्या या पोस्टरवर आता गिरीश बापट यांचे पुत्र गौरव बापट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गौरव बापट म्हणाले की, गिरीश बापटांचा फोटो वापरणं खूपच दुर्दैवी आहे. याचा निषेधच करतो. परंतु हा फोटो वापरला आहे, त्यांचा कॉंग्रेसच्या नेत्यांवर विश्वास राहिलेला दिसत नाही. जे भाजपचे पाच वेळा आमदार होते, दोन वेळा खासदार होते, कॅबिनेट मंत्री होते. त्यांचा फोटो आपल्या प्रचारासाठी वापरणं हे कुठेतरी कॉंग्रेच्याच नेत्यांवर विश्वास नसल्याचे दिसून येतंय. त्यांची पराभूत मानसिकता दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामावर त्यांचा विश्वास बसला आहे. विरोधकांना विरोध म्हणून करावं लागतंय. त्यामुळे आम्ही हे हास्यास्पद म्हणून सोडून देतोय, असे गौरव बापट म्हणाले.

दरम्यान, आपल्या नेत्यांवर विश्वास असता तर अशा गोष्टी त्यांना करण्याची कोणतीही गरज भासली नसती. एखाद्या निवडणुकीत जय पराजय होत असतो. परंतु आज ना उद्या पुण्यात भाजपचा विजय हा निश्चित आहे. मला वाटत नाही की पुण्याची निवडणुक इतकी टफ होईल. चांगल्या पद्धतीने पुण्याची निवडणुक होईल आणि आमचा उमेदवार बहुमताने विजय होईल असेही त्यांनी सांगितले आहे.
दुसरीकडे गिरीश बापट यांच्या निधनानंतर होणारी ही पुण्यातील पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. या निवडणुकीत संपूर्ण बापट कुटुंब हे भाजपसोबत असून मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी आम्ही मैदानात उतरणार आहोत, असेही गौरव बापट यांनी सांगितलं.