• Sat. Sep 21st, 2024
…तर आम्ही त्यांचे काम करणार नाही, भाजप पदाधिकाऱ्यांचा थेट इशारा, महायुतीत गटबाजीला उधाण

बुलढाणा: राज्यात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांमधील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी सार्वत्रिक निवडणूक आहे. लोकसभेच्या ४८ जागांसाठी महाविकास आघाडी आणि महायुती अशी मोठी लढत पहायला मिळणार आहे.
धंगेकरांच्या पोस्टरवर गिरीश बापटांचा फोटो, लेक संतापला-आत्ताच पराभूत झालात, तुमच्या नेत्यांवर विश्वास नाही वाटतं!
बुलढाणा जिल्ह्यात महायुतीत सध्या गटबाजीला उधाण आले आहे. आपल्या नेत्यांना सन्मान दिला जात नाही, त्यामुळे बुलढाणा लोकसभेसाठी खासदार प्रतापराव जाधव यांना तिकीट मिळाल्यास आम्ही त्यांचे काम करणार नाही, असा थेट इशारा भाजप पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट (NCP) या महायुतीच्या घटक पक्षांची बैठक आणि मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात बुलढाणा जिल्ह्यातील भाजप आमदार श्वेता महाले आणि आमदार आकाश फुंडकर यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.यावरून भाजप जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखेडे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभेची उमेदवारी खासदार प्रतापराव जाधव यांना दिल्यास आम्ही काम करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. भूमिकेवर ठाम अर्जुन वानखेडे म्हणाले की, आतापर्यंत भाजपच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याला कार्यक्रमासाठी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने बोलावले नाही. त्यांनी जाणीवपूर्वक श्वेता महाले, आमदार आकाश आकाश फुंडकर यांचे फोटो डावलले आहेत. गटातटाचे राजकारण केल्याशिवाय त्यांचे पोट भरत नाही. एकनाथ शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव हे द्वेष भावनेने राजकारण करतात. त्यांनी मेहकर येथे महायुतीची बैठक बोलावली. मात्र त्यातून भाजप नेत्यांना डावलण्यात आले.

जंगी स्वागतानंतर सभा गाजवली, पण प्रीतम मुंडेंवर बोलताना पंकजांचा कंठ दाटला

आता जाधव यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून कुठलीच अपेक्षा करू नये. भाजप त्यांना कुठलेही सहकार्य करणार नाही. भाजप संपविण्याचे काम बुलढाण्यात या लोकांनी केल्याचा आरोपही त्यांनी केला. प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली तर तुम्ही त्यांचा प्रचार करणार का? असे विचारले असता वानखेडे म्हणाले की, कमळ चिन्ह त्यांना मिळण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे प्रचाराचा मुद्दाच नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed