• Sat. Jun 6th, 2026

    Pune Crime: पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!

    Pune Crime: पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; शाळेतून आला, खेळण्यासाठी घराबाहेर पडला, पण नंतर थेट बॉडी आढळली!

    Shirur News: शाळकरी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याने नातेवाईक आक्रमक झाले असून या घटनेचा उलगडा करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

    पुण्यात 12 वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
    स्नेहल निमगिरे, पुणे: पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. शिरूर तालुक्यातील दहिवडी येथील मांजरे गावात ही धक्कादायक घटना घडली. साई मांजरे असं मृत मुलाचं नाव असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, साई मांजरे हा मुलगा शाळेतून घरी आल्यानंतर कपडे बदलून खेळण्यासाठी बाहेर गेला होता. मात्र बराच वेळ होऊनही तो घरी परत आलाच नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. काही वेळाने गावाजवळील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. मृतदेह आढळल्यानंतर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. प्राथमिक तपासात साईच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा मृत्यू अपघाती आहे की घातपात, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनास्थळी वनविभागाची टीमही दाखल झाली असून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. तपासानंतर मृत्युचे नेमके कारण स्पष्ट होईल.

    चिमुकल्याच्या संशयास्पद मृत्यूनंतर स्थानिक आता आक्रमक झाले आहेत. जोपर्यंत साईच्या मृत्युचे कारण स्पष्ट होत नाही, दोषी कोण हे समजत नाही, कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह जागेवरून हलवू देणार नाही अशी आक्रमक भूमिका स्थानिक ग्रामस्थ यांनी घेतली आहे.

    दरम्यान, या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. या मृत्यू प्रकरणाचे गूढ उलडणार का? हा अपघात आहे की घातपात? अशा चर्चांनी जोर धरला असून पोलीस तपासानंतर याबाबतचे सत्य समोर येणार आहे.

    अक्षय शितोळे

    लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे | २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत असताना राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधण्याचेही काम करत आहे. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत. यापूर्वी लोकमत, न्यूज १८ लोकमत आणि एबीपी माझा या संस्थांमध्येही कामाचा अनुभव असून मुंबईतील रूईया महाविद्यालयातून पत्रकारितेत पदवी प्राप्त केली आहे.… आणखी वाचा