• Sat. Sep 21st, 2024

दादांची बदनामी कशाला करता? युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा घेराव

दादांची बदनामी कशाला करता? युगेंद्र पवार यांना अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांचा घेराव

दीपक पडकर, बारामती : गावभेट दौऱ्याच्या निमित्ताने सोमेश्वरनगर भागात फिरत असलेले शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांना अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका केली जात असून त्यालाही आवर घाला, अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे करण्यात आली.

युगेंद्र पवार हे सध्या बारामती तालुक्यात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासंबंधी श्रीनिवास पवार यांनी नुकतीच काही मते व्यक्त केली होती. त्या व्हीडिओचा आधार घेत तो सोशल मिडियावर फिरवला जात आहे. त्यात काही ठराविक वाक्यांची रिल्स बनवून तीच वारंवार ऐकवली जात आहेत, अशी तक्रार करून सोशल मीडियाचे काम बघणाऱ्या कार्यकर्त्यांना आवर घाला, अशी मागणी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवार यांच्याकडे केली.
अजितदादांचं म्हणणं खरं ठरलं, सुप्रिया सुळेंच्या पाठीशी संपूर्ण पवार कुटुंब, सोशल मीडियावर ‘वटवृक्षा’चे रील्स

आम्ही पवार कुटुंबावर कायम प्रेम करत आलो आहोत. परंतु अजित पवार यांच्याबद्दल श्रीनिवास पवार बोलले तो व्हिडीओ एडीट करून तो जाणूनबुजून व्हायरल केला जात असल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. युगेंद्र यांनी ते ऐकून घेतले. यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर युगेंद्र पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.
वयस्कर व्यक्तीची किंमत नाही, यासारखा नालायक माणूस नाही, अजितदादांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार संतप्त

सख्खा भाऊ अजित पवार यांच्याविरोधात!

ज्या शरद पवार साहेबांनी पंचवीस वर्षे दादांना मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! असा काका मला असता तर, मी खुश झालो असतो.. असे म्हणत अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्यावर तोफ डागली.

माध्यमांनी उगाच ट्विस्ट दिला, श्रीनिवास पवार हे अजितदादांबद्दल चुकीचं बोलले नाहीत : युगेंद्र पवार

मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्ष दादांची आहेत, साहेबांची नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा जळजळीत शब्दात श्रीनिवास पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करून शरद पवार यांच्या मागे उभे असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed