• Mon. Nov 25th, 2024
    रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी राऊतांच्या विरोधात कोण रिंगणात उतरणार? ‘यांची’ नावं चर्चेत

    रत्नागिरी: लोकसभा निवडणुका जाहीर होऊन चार दिवस झाले तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याचा तिढा अद्याप कायम आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेची केवळ औपचारिकता बाकी आहे. मात्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा विषय महायुतीसाठी प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजपचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना नेते उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरणभैय्या सामंत ही दोन नाव प्रामुख्याने या मतदारसंघासाठी चर्चेत आहेत.
    राजेंद्र गावित यांची उमेदवारी अडचणीत? भाजप पदाधिकाऱ्यांनी दंड थोपटले, वरिष्ठांकडे मागणी
    महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्या उमेदवारीची घोषणा यापूर्वीच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी झाली आहे. विनायक राऊत यांच्यासमोर महायुतीकडून तुल्यबळ उमेदवार असल्याच निभाव लागू शकतो. त्यामुळे महायुतीकडून सामंत की राणे याची उत्सुकता अनेकांना आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा कोकणातील जनसंपर्क मोठा आहे. सर्वपक्षीय असलेले राणे यांचे संबंध, राणे यांची काहीशी आक्रमक शैली, तसेच राणे यांचे ज्येष्ठ सुपुत्र असलेले निलेश राणे याच मतदारसंघात यापूर्वी खासदार राहिले आहेत. त्यांचाही संपर्क आजवर या मतदारसंघात कायम राहिला आहे. या नारायण राणे यांच्यासाठी जमेच्या बाजू आहेत.मात्र नारायण राणे यांचा वयाचा विचार करता राणे यांना पर्याय म्हणून महायुतीकडून अन्य उमेदवाराचा विचार होऊ शकतो. शिवसेना नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू असलेले किरण भैय्या सावंत हे शासनाच्या रत्न सिंधू योजनेचे सदस्य आहेत. त्यांनी गेले काही महिने लोकसभा मतदारसंघात भेटीगाठी संपर्क सुरू केला आहे. इतकेच नाही तर उदय सामंत यांच्या यशस्वी कारकिर्दीमागे आणि उदय सामंत यांच्या प्रत्येक निवडणुकीत किरणभैय्या सामंत यांचा सिंहाचा वाटा आहे. भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ही दोन वेळा भेट घेत किरण सामंत यांनी आशीर्वाद घेतला आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी नारायण राणे यांच्या ऐवजी किरणभैय्या सामंत यांना मिळू शकते.

    राज ठाकरे महायुतीत आले तर नक्कीच फायदा होईल, विखे पाटलांना विश्वास

    राणे यांचा आशीर्वाद असल्यास सामंत यांच्यासाठी ही निवडणूक काहीशी सोपी होईल. सामंत कुटुंबीय हे मूळचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील आहे. मात्र या कुटुंबाची कर्मभूमी रत्नागिरी राहिली आहे. त्यामुळे सामंत उमेदवार असल्यास त्यांना सिंधुदुर्गात मोठे काम करावे लागेल. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्यासमोर महायुतीकडून आता कोणता तुल्यबळ उमेदवार दिला जातो याची उत्सुकता अवघ्या कोकणालाच नव्हे तर राज्याला लागून राहिली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed