• Sat. Sep 21st, 2024

फोटो काढायचाय सांगून टॅक्सी थांबवली अन् महिलेनं अटल सेतूवरून उडी मारली, चिठ्ठीत लिहिलं…

फोटो काढायचाय सांगून टॅक्सी थांबवली अन् महिलेनं अटल सेतूवरून उडी मारली, चिठ्ठीत लिहिलं…

नवी मुंबई: अटल सेतू ह्या मार्गाला जगभरातून पसंती मिळत आहे. मात्र मार्ग सुरू होताच अनेक प्रवाशांनी ह्या मार्गाने हौस म्हणून प्रवास केला तर काहींनी कामानिमित्त प्रवास केला. आता या मार्गावर एक धक्कादायक घटना घडली आहे. ह्या मार्गावरून जाणाऱ्या एका महिलेने चक्क टॅक्सी थांबवून थेट उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे.
शरद पवारांमुळे माझं मुख्यमंत्रिपद हुकलं, अनंतराव थोपटेंनी जुनी आठवण सांगितली, यंदा उट्टं काढणार?
मिळालेल्या माहितीनुसार, किंजल शाह वय (४३) असं या महिलेचं नाव आहे. न्हावा शेवा पोलिसांकडून त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे. मात्र, अटल सेतूवरुन आत्महत्येचा प्रकार घडल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. डॉ. किंजल शहा गेल्या अनेक वर्षांपासून नैराश्यात होत्या. नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे. त्या दादरच्या नवीन आशा इमारतीत त्यांच्या कुटुंबीयांसह राहत होत्या. बाहेर काम आहे, असं सांगून त्या घरातून सकाळच्या वेळी निघाल्या होत्या. त्यानंतर किंजल शहा यांनी अटल सेतूवर येताच टॅक्सी चालकाला फोटो काढायचा आहे, असं सांगून टॅक्सी थांबवली.त्यानंतर टॅक्सीमधून उतरून त्यांनी अटल सेतूवरून उडी मारून आत्महत्या केली. या झालेल्या घटनेचे गांभीर्य ओळखून टँक्सी चालकाने पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी लिहून ठेवलेली सुसाईड नोट वडिलांना सापडली. अटल सेतूवर टॅक्सीने आत्महत्या करण्यासाठी जात असून टॅक्सी चालकास त्रास देऊ नये, असे त्यांनी त्या चिठ्ठीत लिहिलेले होते. त्यांच्या वडिलांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. भोईवाडा पोलिसांनी न्हावा शेवा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर महिलेची ओळख पटली.

सांगलीच्या जागेवर काँग्रेसचा दावा, चंद्रहार पाटील म्हणतात ठाकरेंकडून माझीच उमेदवारी फिक्स!

मात्र त्याआधी भोईवाडा पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती. ही महिला दादरहून १.४५ वाजता टॅक्सीत बसल्याचे आढळले होते. त्या दिशेने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. त्यांनी २.१४ वाजता अटल सेतूवरुन उडी मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यांचा शोध घेण्यासाठी अटल सेतू येथील समुद्रात मच्छिमारांची मदत घेतली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed