• Sat. Sep 21st, 2024
लोकसभेच्या जागेवरून महायुतीत वादाची ठिणगी? गावित यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध, म्हणाले…

पालघर: पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीतील उमेदवारीचा तिढा अजूनही कायम असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात सध्या शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र गावित हे खासदार आहेत. मात्र खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी दिल्यास खासदार गावित निवडून येणार नाहीत, असे मत भाजप पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. पालघर लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाची आठ ते दहा टक्केच मत असल्याने ही जागा भारतीय जनता पक्षाने लढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्हाध्यक्षांनी वरिष्ठांकडे केली आहे.
काँग्रेसमध्ये गर्दीच नसायची, ए खुदा, तेरा शोरुम इतना, तो गोडाऊन कितना? उल्हास पाटलांची शेरोशायरी
पालघर लोकसभा मतदारसंघात राजेंद्र गावित हे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार असून पालघर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे श्रीनिवास वनगा हे आमदार आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेची ताकद असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे देखील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. पालघर लोकसभेची जागा खासदार राजेंद्र गावित लढवणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र खासदार राजेंद्र गावित यांच्या उमेदवारीला भारतीय जनता पक्षाच्या पालघर जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी विरोध केल्याचे पहायला मिळत आहे. खासदार गावित हे निवडून येणार नाहीत, त्यामुळे पालघर लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाने लढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

दुसऱ्या पक्षांच्या नेत्यांना भेटायचं का? उद्धव ठाकरे भेटत नसल्याची महिला पदाधिकाऱ्यांनी तक्रार, चंद्रकांत खैरे संतापले

पूर्वाश्रमीची असलेली पालघर लोकसभेची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी. लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवार द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केली आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाची ठिणगी पडते की काय? असे चित्र निर्माण झाले आहे. पालघर लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा अजूनही कायम असल्याचे यामुळे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed