• Sat. Sep 21st, 2024
निलेश लंके यांची ‘डबल’ भूमिका, वकीलही संभ्रमात, सुप्रीम कोर्टात काय घडलं?

अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके नेमके कोणत्या गटाचे यावरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. आता त्यांच्यावरूनच दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मंगळवारी झालेल्या सुनावणीच्यावेळी शरद पवार यांचे फोटो कोण वापरते? यावरून हा विषय निघाला होता. दिल्लीत झालेल्या या सुनावणीची सविस्तर माहिती नगरला प्राप्त झाल्यानंतर आता यावरून मतदरसंघात चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीच्या शरद पवार व अजित पवार या दोन्ही गटांमध्ये पक्ष चिन्हावरून वाद आहेत. शरद पवार गटाला तुतारी व अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह दिले गेले आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शरद पवार यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या या याचिकेच्या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाने दिलेले तुतारी हे चिन्ह लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीसाठीही वापरता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
इकडे सुजय विखेंचं तिकीट जाहीर, तिकडे शरद पवारांनी डाव टाकला, निलेश लंकेंचा उद्या प्रवेश!

आयोगाच्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हे मूळ चिन्ह अजित पवार यांच्याकडे असले, तरी ते वापरताना प्रत्येक ठिकाणी चिन्हाबाबतचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि त्यावरचा निर्णय येईपर्यंतच हे चिन्ह वापरण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने आपल्या पक्षाला दिली आहे, असे लिहिण्याचे निर्देश न्यायालयाने अजितदादांना दिले आहेत.
विचारधारेची गोष्ट सांगितली, तुतारी हाती घेतली, पण निवडणुकीची भूमिका अजूनही तळ्यात मळ्यात, लंके म्हणतात….

या दरम्यानचा पवार यांच्या फोटोचाही विषय निघाला. अजित पवारांसोबतचे आमदार निलेश लंके हे शरद पवारांचा फोटो वापरत असल्याचे शरद पवारांचे वकील अ‍ॅड. सिंघवी यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. त्यावर, लंके आधीच पवारांच्या गटात गेले असल्याचा दावा अजितदादांच्या वकिलांनी केला.

पवार इज पॉवर, पॉवर इज पवार, निलेश लंकेंचं पत्रकारांच्या प्रश्नावर नेमकं उत्तर

अ‍ॅड. सिंघवी यांनी तो नाकारला आणि लंके केवळ एका कार्यक्रमापुरते आले होते, पण अधिकृतपणे आजही ते अजितदादा यांच्याकडेच आहेत, असे सांगितले. एकूणच, शरद पवार आणि अजित पवारांच्या वकिलांत आमदार लंकेंसह अन्य अशा काही मुद्द्यांवरून शाब्दिक चकमक झाल्याने त्याची नगरला चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed