• Mon. Nov 25th, 2024

    कुणाचा प्रचार करायचा हे मी ठरवलं नाही, अनंतराव थोपटेंच्या विधानाने नव्या भूकंपाचे संकेत

    कुणाचा प्रचार करायचा हे मी ठरवलं नाही, अनंतराव थोपटेंच्या विधानाने नव्या भूकंपाचे संकेत

    भोर (पुणे): शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आज भोर येथे अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी थोपटे यांनी माध्यमांशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांच्यामुळे मुख्यमंत्रिपद हुकल्याचं आवर्जून सांगत यंदा बारामती लोकसभेला प्रचार कुणाचा करायचा हे अद्याप ठरवले नसल्याचे थोपटे म्हणाले. त्यांचे हे विधान शरद पवार यांना धक्का असल्याचे मानले जात आहे.

    अनंतराव थोपटे म्हणाले, “त्यावेळी दिल्ली माझ्यासोबत होती. मात्र शरद पवार शेवटपर्यंत माझ्या विरोधात होते. त्यामुळे तेव्हा माझा पराभव कसा झाला हे सर्वांना माहिती आहे”, असे सांगून तत्कालिन पराभवाला थोपटे यांनी शरद पवार यांना जबाबदार धरले. थोपटे यांच्या या विधानाने त्यांच्यातील पवारविरोधाचे दर्शन घडून लोकसभा निवडणुकीत ते काही वेगळा विचार करतील का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

    पुढे बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले की, शरद पवार मला काही दिवसांपूर्वी भेटून गेले आहेत. शरद पवार यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहे. याच लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे इच्छुक आहेत. त्यामुळे मी कुणाचा प्रचार करणार हे मी कुणालाही सांगितलेले नाही किंवा त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही, असे विधान करून बारामतीत नव्या समीकरणाच्या नांदीचे संकेत थोपटे यांनी दिले.
    तुम्ही CM झाले असते, संग्राम मंत्री झाले असते, पण…. थोपटेंपुढे शिवतारेंनी पवारांच्या अन्यायाचा पाढा वाचला

    कसा झाला होता पराभव

    अनंतराव थोपटे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना थोपटे यांना शरद पवार यांनीच विरोध केला होता. त्यावेळी थोपटे यांच्याविरोधात काशिनाथ खुटवड यांना उमेदवारी देऊन अनंतराव थोपटे यांचा पराभव केला होता. त्यानंतर तब्बल २५ वर्षानंतर शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. त्यावेळीही शरद पवार यांनी सोनिया गांधी यांचा परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर थोपटे यांच्याविरोधात उमेदवार देऊन त्यांचा पराभव केला होता.
    मृत्यूच्या दाढेतून परतलोय! बारामती नियतीनं दिलेली असाईनमेंट; शिवतारे ठाम, अजितदादांची कोंडी

    साडे पाच लाख मते पवारविरोधी, त्यांनी कुठे जायचे?

    बारामतीत ६ लाख ८६ हजार मते शरद पवार यांच्या बाजूची आहेत परंतु साडे पाच लाख मते पवारविरोधी आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. एका बाजूला नणंद आणि एका बाजूला भावजय… अशावेळी साडेपाच लोकांनी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित करत लोकांना पवारविरोधी मतदान करायला माझ्या रुपाने संधी मिळेल, असे शिवतारे यांनी थोपटे यांना सांगितले तसेच निवडणुकीत आशीर्वाद राहू द्या म्हणत आर्जव केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *