• Mon. Nov 25th, 2024
    बारामतीबाबत ‘सागर’मंथन, फडणवीसांचं तातडीचं बोलावणं, हर्षवर्धन पाटील कन्येसह चर्चेला

    मुंबई : माजी मंत्री आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने ‘सागर’ बंगल्यावर बोलावणं धाडलं. मागील तीन लोकसभा निवडणुकांमध्ये फसवणूक झाल्याचा आरोप करत ‘आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतर लोकसभेचे पाहू,’ असा आक्रमक पवित्रा घेणाऱ्या हर्षवर्धन पाटलांची फडणवीसांसोबत चर्चा सुरु आहे.

    बारामती मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या गेल्या चारही निवडणुकांमध्ये निर्णायक भूमिका बजावणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना त्यासाठीच फडणवीसांनी ‘मन की बात’ करण्यासाठी बोलावलं आहे. सकाळी ११ वाजताच्या सुमारास हर्षवर्धन पाटील आणि त्यांची कन्या, अर्थात ठाकरेंची सून अंकिता पाटील हे दोघेही सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत.
    राज ठाकरे दिल्लीत अमित शाहांच्या घरी, ४० मिनिटं बैठक, अमित ठाकरेंच्या ‘फ्रंट सीट’ची चर्चा
    कालच देवगिरीवर माजी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलावून बारामती लोकसभा संदर्भात सविस्तर चर्चा केली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सुरु असलेली चुरस लक्षात घेता, राज्यातील महायुतीचे ज्येष्ठ नेते या मतदारसंघाकडे विशेष लक्ष देत आहेत.
    बैठक भाजप-मनसे महायुतीची, विषय उद्धव ठाकरेंचा; अमित शाहांनी राज ठाकरेंना सांगितला २०१९ चा किस्सा
    बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाच्या सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे असा सामना रंगलेला पाहायला मिळतोय. कुटुंबातील नणंद-भावजयेमधली ही लढत दोन्ही पक्षांसाठीही प्रतिष्ठेची झाली आहे.
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    हर्षवर्धन पाटील यांची कारकीर्द

    हर्षवर्धन पाटील हे तब्बल चार वेळा इंदापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दत्तात्रय भरणे यांनी बंडखोरी करत हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती, त्यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीने आघाडी न करता स्वतंत्रपणे निवडणूक लढवलेली. त्यामुळे इंदापूरमध्ये काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील, तर राष्ट्रवादीकडून दत्तात्रय भरणे यांच्यात लढत झाली होती. परंतु सलग चार वेळा विधानसभा जिंकणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांना २०१४ मध्ये भरणेंनी पराभूत केलं.

    हर्षवर्धन पाटील यांच्याशी फडणवीस तर शिवतारेंशी मुख्यमंत्री चर्चा करतील, बारामतीसाठी महायुतीची फिल्डिंग

    २०१९ मध्ये हर्षवर्धन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश करत इंदापुरातून तिकीट मिळवलं. परंतु तेव्हाही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होता. तेव्हापासून ते मोठ्या पदाच्या प्रतीक्षेत होते. विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकांच्या उमेदवारीवेळी हर्षवर्धन पाटलांचं नाव शर्यतीत असे, परंतु त्यांना तिकीट मिळालं नाही.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed