• Mon. Nov 25th, 2024
    बारामती-शिरुरमध्ये शरद पवारच ‘पैलवान’, उमेदवारांचा प्रचार सुरु; महायुतीत अजूनही वेटिंग

    पुणे: लोकसभा निवडणुकीचे वारे आता देशभर वाहू लागले आहे. त्यात पुणे जिल्हा हा लोकसभेसाठी सर्वात महत्त्वाचा मानला जात आहे. शरद पवारांचा बालेकिल्ला म्हणून पुणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. राज्याच्या राजकारणात अनेक घडमोडी घडल्यानंतर आता लोकसभेची तयारी जोरात सुरू आहे. मात्र, पुणे जिल्ह्यात माहत्वाच्या असणाऱ्या शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघात शरद पवारांचे पारडे जड पहायला मिळत आहे. त्यामुळे ८४ वर्षांच्या पैलवानाची ताकद पुन्हा एकदा सरस ठरताना दिसत आहे.

    बारामती आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदार संघात शरद पवार यांचे तगडे उमेदवार आहेत. मात्र, शिरूरमध्ये मात्र महायुतीला तगडा उमेदवार अद्यापही मिळालेला नाही. या उलट शिरूरच्या उमेदवाराने नाटकातून अन्य मार्गाने दणक्यात प्रचार सुरू केला आहे. शिवाय, बारामतीत सुप्रिया सुळे यांनी देखील आपल्या प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे बारामती ही शरद पवारांचीच असल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मैदानात उतरवले आहे. त्यामुळे लढत जोरात होणार आहे.

    मात्र, या दोन्ही मतदारसंघात शरद पवार यांचे पारडे जड होताना पहायला मिळत आहे. कारण, विरोधकांना त्या ठिकाणी उमेदवार मिळत नाहीये. एका ठिकाणी विरोधकांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार हेच पुन्हा पुणे जिल्ह्याचे “बाप” ठरणार का? हे आता येणारा काळच ठरवणार आहे. सध्या मात्र शरद पवार यांचे पारडे जड असल्याचे पाहायला मिळत आहे.

    शिरूरमध्ये कोल्हे विरुद्ध आढळराव लढत?

    महाविकास आघाडीचा उमेदवार प्रचारात व्यस्त असताना मात्र महायुतीकडून अद्याप उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील हे उमेदवार असल्याचे बोलले जात असून त्याचे चित्र दोन दिवसात स्पष्ट होणार आहे. त्यामुळे शिरूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed