• Thu. Jul 23rd, 2026

    विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?

    विधानसभेला दोनदा पराभव, तरीही ठाकरेंकडून संधी, आमदारकी दिली; तोच नेता शिंदे गटात जाणार?

    नंदूरबार: लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित होताच उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीत दोनदा पराभूत होऊनही ठाकरेंनी विधान परिषदेच्या माध्यमातून आमदार केलेला नेता ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. आदल्या दिवसापर्यंत आपण कुठेही जाणार नसल्याचं सांगणारे आमदार आमश्या पाडवी रात्री त्यांच्या कार्यकर्त्यांसह मुंबईला पक्ष प्रवेशासाठी रवाना झाले आहेत. त्यांचा पक्षप्रवेश आज होण्याची शक्यता आहे.

    नंदूरबारमधील ठाकरेंचे विश्वासू शिलेदार अशी पाडवी यांची ओळख आहे. १९९५ पासून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली. कोवली विहीर गावचे सरपंच म्हणून ते निवडून आले. अक्कलकुवा पंचायत समितीचे सभापतीपद त्यांनी दोनदा भूषवलं. २० वर्षे ते पंचायत समिती सदस्य होते. अकरा वर्षांपासून ते सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आदिवासींच्या विविध प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेत आहेत. वेळोवेळी मोर्चे, आंदोलन करत आहेत.
    अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?
    २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेत प्रवेश केला. तेव्हापासून त्यांच्याकडे जिल्हाप्रमुखपद देण्यात आलं. त्यांनी दोनदा विधानसभा निवडणूक लढवली. पण दोन्हीवेळा त्यांचा पराभव झाला. पण आक्रमक आदिवासी चेहरा असल्यानं ठाकरेंनी त्यांना विधानपरिषदेवर संधी दिली. त्यासाठी ठाकरेंनी अनेक बड्या नेत्यांना बाजूला सारलं. २०२२ मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.
    दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
    आमश्या पाडवींनी २०१४ मध्ये अक्कलकुला मतदारसंघातून निवडणूक लढवली. त्यावेळी ते मतदारसंघात चौथ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेस नेते के. सी. पाडवींनी निवडणूक जिंकली. २०१९ मध्ये आमश्या पाडवींनी के. सी. पाडवींसमोर आव्हान उभं केलं. त्यांनी ८० हजारांहून अधिक मतं घेतली. पण के. सी. पाडवींनी केवळ २ हजारांच्या फरकानं विजय मिळवला. पण ठाकरेंनी पाडवींना आमदार केलं. त्यांना विधान परिषदेवर निवडून आणलं. आता तेच पाडवी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणार आहेत.
    Crime News: मित्रावर विश्वास ठेवला अन् महिलेचा घात झाला; रूममध्ये ५ दिवस सोबत राहिले, पण त्याने जाताना धोका दिला!
    कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ६१,९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटींचा लाभ मिळणार – मंत्री बाबासाहेब पाटील – महासंवाद
    सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed