२७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रकाशित झालेल्या प्रारूप मतदार यादीत पुरुष मतदार १५ लाख ४९ हजार ३३५, महिला मतदारांची संख्या १३ लाख ९५ हजार ७७५ आणि तृतीयपंथी मतदार १०१ असे एकूण मतदारसंख्या २९ लाख ४५ हजार २११ होती. तर २३ जानेवारीच्या अंतिम मतदार यादीमध्ये पुरुष मतदार १५ लाख ७० हजार ७३९, स्त्री मतदार १४ लाख २२ हजार ५३१ व तृतीयपंथी मतदार १३३ असे एकूण मतदारसंख्या २९ लाख ९३ हजार ४०३ इतकी आहे. त्यामध्ये एक लाख २० हजार ६६० नवीन मतदार नोंदणी झाली, तर ६३ हजार २०७ एवढ्या मतदारांची नावे वगळली गेली आहेत. वगळण्यात आलेली ही नावे दुबार, मयत, कायमस्वरूपी स्थलांतरित या मतदारांची होती.
दरम्यान, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही अनेकांनी मतदार यादीत नाव नोंदणी केली. त्यामुळे मतदारांच्या संख्येत भर पडली असून, १५ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या ही ३० लाख ३१ हजार ३१४ एवढी झाली आहे.
मतदारसंघातील मतदारसंख्या
वयोगट मतदारसंख्या
१८-१९ ४१,२७७
२०-२९ ६,२२,८९७
३०-३९ ७,५५,३८८
४०-४९ ६,३२,९१२
५०-५९ ४,६७,९३५
६०-६९ २,७४,९६४
७०-७९ १,५१,४७१
८० वर्षांवरील ८४,४७०