• Sat. Sep 21st, 2024

अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

अखेर मविआचं ठरलं! वंचितबद्दल मोठा निर्णय; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? कोणाला किती जागा?

मुंबई: निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पण महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात अद्याप जागावाटप झालेलं नाही. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपाचा तिढा कायम आहे. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नांना अपयश येताना दिसत आहे. त्यामुळे वंचितच्या मविआमध्ये सहभागी होण्याच्या आशा मावळल्या आहेत

महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक काल रात्री संपन्न झाली. शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. वंचित बहुजन आघाडीबद्दल या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. वंचितनं मविआचा ४ जागांचा प्रस्ताव फेटाळला आहे. वंचितनं थेट १७ जागांची मागणी केली. त्यानंतर आता वंचितला कोणताही नवा प्रस्ताव पाठवायचा नाही, असा निर्णय मविआनं घेतला आहे. त्यामुळे मविआमध्ये वंचितची एंट्री होणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे.
दोघेही तातडीनं मुंबईला या! उद्धव ठाकरेंचं फर्मान; तणातणी वाढली, दिलजमाई होणार?
लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर संपन्न झालेल्या मविआच्या बैठकीत जागावाटपाच्या अंतिम फॉर्म्युलावरही चर्चा झाली. या बैठकीला शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काँग्रेसकडून अशोक गेहलोत, राज्य काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला, बाळासाहेब ठाकरे, तर शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत हजर होते. जागावाटपाचा तिढा सोमवारी किंवा मंगळवारी सुटण्याची दाट शक्यता आहे.

आंबेडकरांच्या वंचितला मविआकडून ४ जागांचा प्रस्ताव देण्यात आला. या ४ जागांचा समावेश त्यांनी मागणी केलेल्या जागांच्या यादीत होता. पण मविआचा प्रस्ताव वंचितला मान्य नाही. त्यांनी सुधारित प्रस्ताव देण्याची मागणी केली. पण वंचितला ४ पेक्षा अधिक जागा देण्याची मविआची तयारी नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आंबेडकरांना कोणताही नवा प्रस्ताव दिला जाणार नाही.
शिंदेंच्या खासदारानं प्रचाराचा नारळ फोडला; भाजपला तोच मतदारसंघ हवा, महायुतीत पेच वाढला
मविआचा फॉर्म्युला काय?
महाविकास आघाडीत ठाकरे गट आणि काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळू शकतो. काँग्रेस आणि ठाकरेंना प्रत्येकी १८, शरद पवारांना ६ जागा सुटण्याची शक्यता आहे. वंचितला ४ जागांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तर रासप आणि स्वाभिमानीला प्रत्येकी एक जागा सोडण्याची तयारी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed