• Mon. Nov 25th, 2024
    नार्वेकरांची उमेदवारी जवळपास फिक्स, पण रात्रीच्या भेटीनं नवा ट्विस्ट; समीकरणं बदलणार?

    मुंबई: राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नाही. जवळपास १० जागांमुळे जागावाटप अडलं आहे. या १० जागांपैकी कोणत्या जागा कोणत्या पक्षांकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. याबद्दलचा निर्णय एक ते दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.

    महायुतीचं ८० टक्के जागावाटप पूर्ण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. महायुतीचं जागावाटप १० जागांमुळे रखडल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शिंदेंची शिवसेना १३, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस किमान ६ जागांसाठी आग्रही आहे. दोन्ही मित्रपक्षांना त्यांच्या मागणीप्रमाणे जागा दिल्यास १९ जागा सोडाव्या लागतील. अशा परिस्थितीत भाजपला २९ जागा लढवाव्या लागतील. भाजपचे राज्यातील नेते त्यासाठी राजी नाहीत. भाजपनं किमान ३४ जागा लढवाव्यात. वाटाघाटीत ३४ च्या खाली येऊ नये, अशी राज्य भाजपची भूमिका आहे. त्यामुळे आता चेंडू भाजपश्रेष्ठींच्या कोर्टात आहे.
    पक्ष, चिन्ह जाऊनही ठाकरे, पवार सुसाट; शिंदेसेना, अजितदादांसह महाशक्तीलाही धक्का, सर्व्हे आला
    १० जागांवर तिढा, कुठे कोणाचा दावा?

    जागावाटप रखडलेल्या १० पैकी ६ जागांवर शिवसेना, भाजपचा दावा आहे. तर ३ जागांवर भाजप, राष्ट्रवादीनं दावा सांगितला आहे. तर एका जागेवर भाजप-सेनेसोबतच मनसेचीही चर्चा आहे. मनसे युतीत आल्यास त्यांच्याकडून दक्षिण मुंबईचा आग्रह आहे. या मतदारसंघातून शिवडीचे माजी आमदार बाळा नांदगावकर यांना तिकीट दिलं जाऊ शकतं.

    मनसेला सोबत घेण्यासाठी हालचाली
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेण्यासाठी भाजपनं प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीत त्यांना सामावून घेऊन त्यांच्यासाठी दक्षिण मुंबईची जागा सोडायची, असा विचार भाजपकडून सुरू आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याची गुरुवारी रात्री मुंबईत भेट घेतली. विशेष म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भाजपकडून दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याचे स्पष्ट संकेत मिळत असताना, नार्वेकर मतदारसंघात कामाला लागले असताना मनसेमुळे नवा ट्विस्ट आला आहे.
    ठाकरेंचं काँग्रेसला आवाहन; वंचितनं ‘तो’ प्रस्ताव फेटाळला; मविआसाठी आजचा दिवस महत्त्वाचा
    भाजपला मनसे सोबत का हवी?
    मराठी माणूस, मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा डाव, गुजरातला गेलेले उद्योग, मराठी अस्मिता, महाराष्ट्र धर्म या मुद्द्यांचा उल्लेख उद्धव ठाकरेंच्या सभांमध्ये असेल. पक्षात अभूतपूर्व फूट पडूनही मुंबईत ठाकरेंची ताकद कायम आहे. त्यांच्याबद्दल सहानुभूतीही आहे. त्यामुळे मुंबईत ठाकरेंना डॅमेज करण्यासाठी भाजपला राज यांची साथ महत्त्वाची वाटते. ठाकरेंना उत्तर देण्यासाठी ठाकरेच मैदानात आल्यास भाजपसाठी लढाई सोपी होईल. मुंबई, ठाणे, नाशिकमध्ये राज यांची ताकद आहे. राज युतीत आल्यास भाजपला फायदा होऊ शकतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed