मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने आगामी लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलेलं आहे. आम्हीही निवडणुकांना सामोरे जाऊन परिवर्तनाचा चंग बांधलेला आहे. परंतु निवडणूक आयोगावर जनतेची शंका आहे. कारण त्यांची कार्यपद्धती पाहता ते सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करतात, असं जनतेला वाटतं. त्यामुळे उद्याच्या निवडणुकांत निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकाचं निरसन करावं, निष्पक्षपणे काम करावं, कायदा सुव्यवस्था आणि पैशांची उधळपट्टी यावर नियंत्रण आणावं. टी एन शेषन जेव्हा निवडणूक आयुक्त होते, तेव्हा निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही, अशी जनतेला खात्री होती परंतु आज निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही यात्री खात्री कोण देणार? अशा शब्दात निवडणूक आयोगाला लक्ष्य करीत पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेतील काय? असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी विचारला आहे.संपूर्ण देशाला उत्कंठा लागून राहिलेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यासह नवनियुक्त निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरून त्यांना लक्ष्य करीत सत्ताधाऱ्यांवरही बाण सोडले.
लोकसभा निवडणुकांची घोषणा, देशात ७ टप्प्यांत मतदान, ४ जूनला निकाल, संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर…!मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू
राऊत म्हणाले, आम्ही निवडणुकांना सामोरे जाऊन परिवर्तनाचा चंग आम्ही बांधलेला आहे. देशातील स्वातंत्र्य टिकविण्याचा आमचा निर्धार आहे. परंतु जनतेची निवडणूक आयोगावर शंका आहे. कारण त्यांची कार्यपद्धतीवरून सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली आयोग काम करत असल्याची जनभावना आहे. त्यामुळे उद्याच्या निवडणुकांत आयोगाने शंकाचं निरसन करावं, निष्पक्षपणे काम करावं, कायदा सुव्यवस्था आणि पैशांची उधळपट्टी यावर त्यांनी नियंत्रण आणावं. जनतेसहित आमचा ईव्हीएमवर विश्वास नाही तरीही आम्ही निवडणुकांना सामोरे जातोय. मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
Lok Sabha Elections 2024 Schedule : लोकसभा निवडणुकांसाठी महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान, ४ जून रोजी निकाल
पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी मोदी देऊ शकतील का?
जेव्हा टीएन शेषन देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त होते, तेव्हा त्यावेळी जनतेला विश्वास होता की निवडणुकांत घोटाळा, चोऱ्यामाऱ्या होणार नाही. पण आज आयोगावर जनतेला शंका आहे. या देशात खरोखर लोकशाही राहणार आहे की नाही, याकडे जग डोळे लावून बसलंय. त्यामुळे पारदर्शक निवडणुकांची गॅरेंटी मोदी देऊ शकतील का? असा सवाल राऊत यांनी विचारला.
लोकसभेसाठी मराठा बांधव सज्ज, वाराणसी आणि गांधीनगरमधून निवडणूक लढवून मोदी शाहांना टक्कर देण्याचा निर्धार
एव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही तरीही आम्ही निवडणुकांना सामोरे जातोय
एव्हीएमवर जनतेचा विश्वास नाही तरीही आम्ही निवडणुकांना सामोरे जातोय. मोदींनी गॅरंटी घ्यावी की खरोखर निवडणुका पारदर्शक होतील की निवडणूक आयोग इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं म्हणून त्यांना हवे तसे वागणार आहे? असा सवालही राऊत यांनी विचारला.