पुणे : पुणे लोकसभेसाठी भाजपकडून मुरलीधर मोहोळ यांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी भेटीगाठींचा धडाका सुरू केला आहे. शनिवारी त्यांनी पक्षांतर्गत विरोधक असलेले तसेच पुण्याच्या उमेदवारीसाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केलेले माजी आमदार जगदीश मुळीक यांची भेट घेतली. त्याचप्रमाणे त्यांनी राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्याही निवासस्थानी भेट दिली. मतदारसंघातील जातीय गणिते लक्षात घेता निवडणूक काळात नाराजीचा कुठेही फटका बसू नये, याची पुरेपूर काळजी मोहोळ घेताना दिसून येत आहेत.कोथरूडच्या आमदार राहिलेल्या आणि नुकत्याच राज्यसभेवर वर्णी लागलेल्या मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील संघर्षाची वेळोवेळी चर्चा झाली. तसेच पुणे लोकसभेसाठी उमेदवारी मिळविण्याकरिता मोहोळ आणि जगदीश मुळीक यांच्यात जोरदार स्पर्धा होती. दरम्यानच्या काळात मोहोळ आणि मुळीक यांच्यातील पक्षांतर्गत वादाने उचल खाल्ली. परंतु निवडणूक काळात पक्षांतर्गत मतभेद विसरून एकत्र काम करण्याच्या वरिष्ठांच्या सूचनेनुसार हा संघर्ष शमविण्याचा प्रयत्न उमेदवार असलेल्या मोहोळ यांच्याकडून सुरू आहे.
जगदीश मुळीक स्वतः लोकसभेसाठी इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यासोबत मुळीक यांनीतयारीही सुरू केली होती. अयोध्या राम मंदिराच्या उद्घाटनाप्रसंगी पुण्यात भव्य कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले होते. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच मुळीक यांनी कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठं शक्तीप्रदर्शन केले होते. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी उमेदवारीसाठी धडपड केली. महाराष्ट्रातील भाजपचे शीर्षस्थ नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेटही त्यांनी घेतली. पण केंद्रीय निवडणूक समितीने मोहोळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने मुळीक निराश झाले. अगदी कालपरवा मोहोळ यांनी महायुतीच्या नेत्यांना कसबा गणपतीला एकत्र बोलावलं परंतु नाराज मुळीक यांनी दांडी मारली. त्यामुळे आजच्या मोहोळ-मुळीक भेटीला महत्व होतं.

दुसरीकडे खासदार मेधा कुलकर्णी आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील पक्षांतर्गत वाद सर्वश्रुत आहे. गेल्या १० वर्षांपासून एकाच मतदारसंघात काम करत असताना एकमेकांमध्ये मोठी स्पर्धा होती. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीवरून दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. कोथरूड मतदारसंघातून दोन्ही नेते इच्छुक होते. मात्र त्यावेळी मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी दिली गेली होती. म्हणून मोहोळ यांना पाच वर्षे संघर्ष करावा लागला. दरम्यान मोहोळ यांनी ५ वर्ष प्रतीक्षा केल्यानंतर पुन्हा २०१९ ला मोहोळ इच्छुक होते. मात्र २०१९ ला दोघांना डावलून चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. मोहोळ यांनी पुढे पुण्याचे महापौर म्हणून काम केलं. आता तर थेट त्यांना पुणे लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे.