• Sat. Sep 21st, 2024

मतदारसंघात आम्ही तयारी केली, संघटना मजबूत आहे; या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे मन दाखवावे

मतदारसंघात आम्ही तयारी केली, संघटना मजबूत आहे; या जागेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मोठे मन दाखवावे

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, महायुतीतील जागांबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रामटेक लोकसभा जागेवर मोठे वक्तव्य केले आहे. रामटेक लोकसभा जागेची शिवसेनेकडे मागणी करताना बावनकुळे म्हणाले की, येथे भाजपचे संघटन खूप मजबूत आहे. बूथपासून ते प्रभागापर्यंत आम्ही तयारी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठे मन दाखवावे.” मात्र, महायुतीच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिकडे तिकडे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले. बावनकुळे म्हणाले, “महायुतीमध्ये दोन-तीन दिवसांत जागावाटप होणार आहे. जागांच्या अदलाबदलीबाबत महायुतीतील सहकाऱ्यांमध्ये बोलणी सुरू आहेत. आम्ही रामटेक लोकसभेची जागा शिवसेनेकडे मागितली असताना, इतर सहकारी आमच्याकडून सीटही मागितली आहे.” पुढे बोलतांना बावनकुळे म्हणाले की, तिन ते चार दिवसांत आमचे सर्व नेते आमचा केंद्रीय नेतृत्वासोबत बैठक करुण निर्णय घेतील. साधरण संपूर्ण ४८ जागा ज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप २५ मार्चपर्यंत आपल्या पक्षाचे निर्णय करतील, आणि २५ मार्चपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होणार असल्याचेही बावनकुळे म्हणाले.
महाराष्ट्र लोकसभा निवडणूक २०२४ संपूर्ण वेळापत्रक

आदर्श आचारसंहिता बाबतीत बोलतांना बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्रमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जगातील सर्वात मोठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्रातील सर्व पक्ष हे निवडणूक लढतीत. व्यक्तिगत स्वरूपात आरोप प्रत्यारोप न होता खेळाडू वृत्तीने ही निवडणूक व्हावी. आपापल्या पक्षाचे काम सर्वांनाच करायचे आहे. आज निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे. या सर्वांच्या साहित्याच्या पालन करून निवडणूक लढवू, भाजप सुद्धा आचारसंहितेचा पालन करेल राज्यात मतभेदाचे वातावरण तयार होईल असे कृत्य करणार नाही या निवडणुकीत ४५ प्लस जागा महायुती जिंकेल असा आमच्या विश्वास आहे. यानंतर मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा आमचे सर्व ४५ खासदार शपथविधी उपस्थित असतील असे बावानकुळे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed