• Sat. Nov 16th, 2024

    राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना

    ByMH LIVE NEWS

    Mar 11, 2024
    राज्याच्या चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा पहिला मान ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ यांना

    मुंबई, दि. 11 :- यंदाच्या जागतिक महिला दिनी (8 मार्च रोजी) जाहीर करण्यात आलेल्या राज्याच्या चौथ्या महिला धोरणात शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये आईचे नाव लिहिणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी तत्काळ करण्याचा मान उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी पटकावला असून मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील त्यांच्या दालनाबाहेर ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ अशी पाटी, सुटीनंतरच्या पहिल्याच कार्यालयीन दिवशी झळकली आहे.

    मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. पवार यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सहाव्या मजल्यावर येणाऱ्या नागरिकांची संख्या सर्वाधिक असते. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर येणाऱ्यांसाठी ही पाटी आकर्षणाचा आणि कौतुकाचा विषय ठरली आहे. राज्याच्या महिला धोरणाची तत्काळ अंमलबजावणीबद्दल, कृतीशील उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या कार्यशैलीचे सर्वांकडून कौतुक होत आहे. 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी राज्याचे चौथे महिला धोरण लागू करण्यात आले. त्यादिवशी महाशिवरात्रीची सुट्टी होती. त्यानंतर शनिवार आणि रविवारची साप्ताहिक सुटी आली. 8 मार्चनंतर सलग तीन दिवसांच्या सुट्टीनंतर मंत्रालयात आलेल्या अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांसाठी, उपमुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेरची ‘अजित आशाताई अनंतराव पवार’ ही पाटी आश्चर्याची आणि कौतुकाचा विषय ठरली, तसेच उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या कृतीशील कार्यशैलीचा पुनर्प्रत्यय देऊन गेली.

    ०००००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed