• Sat. Nov 16th, 2024
    Pankaja Munde: भिंती उभ्या करण्याऐवजी एकी गरजेची; ‘बटेंगे तो कटेंगे’ विवादानंतर पंकजा मुंडेंचे वक्तव्य

    Maharashtra Assembly Election 2024: सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या.

    महाराष्ट्र टाइम्स
    pankaja1

    म. टा. वृत्तसेवा, निफाड : लोकांमध्ये भिंती उभ्या करणे वाईट आहे. पण त्या सर्वांना एक करणे, एकीची वज्रमूठ प्रगती साधणे, हे वाईट नसून गरजेचे आहे, अशी भूमिका भाजप नेत्या तथा आमदार पंकजा मुंडे यांनी मांडली. भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या घोषणेला पंकजा यांनी विरोध केल्यानंतर झालेल्या विवादावर त्यांनी निफाड येथे भूमिका मांडली. आम्ही फक्त विकासावर बोलतो, असेही त्या म्हणाल्या.

    तालुक्यातील सायखेडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) महायुतीचे उमेदवार दिलीप बनकर यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या. यावेळी मुंडे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विनंती केल्याने महायुतीचा धर्म म्हणून मी ही सभा घेतली आहे. लोकसभेत आमच्या उमेदवाराला पराभूत केले, पण आता आपल्याला मोदींच्या नेतृत्वात देशाचा विकास करायचा आहे, म्हणून महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा. दिवंगत गोपिनाथ मुंडे हे अनेक खासदार-आमदार निवडून आणायचे.
    Nashik : बिग फाइट, तिथेच वातावरण टाइट! मंत्री महाजन, भुसे, भुजबळ, पाटील अडकले मतदारसंघात
    तुमच्यात कुवत असेल तर युतीच्या उमेदवाराला माझ्यासाठी मतदान करा. आमच्या सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांना १५०० आणि शेतकऱ्यांना वर्षभरात १८ हजार रुपये देणाऱ्या योजना दिल्या आहेत. यापुढेही या योजनांच्या निधीत वाढ होईल. त्यासाठी आमचे उमेदवार निवडून द्या, असे आवाहन मुंडे यांनी केले. यावेळी उमेदवार बनकर यांनी गोदाकाठ भागात केलेली विकासकामाची माहिती दिली. राजेंद्र डोखळे, यतीन कदम, बाळासाहेब क्षीरसागर, शंकरराव वाघ, जगन कुटे, वैकुंठ पाटील, शिवनाथ कडभाने आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, भाजप व शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    निवडणुकीच्या रिंगणात सर्वाधिक अपक्ष; राज्यात २,०८६ उमेदवार नशीब आजमविणार, कुणाचे किती उमेदवार?
    सिडकोत कार्यकर्ते तीन तास ताटकळले
    सिडको :
    सिडकोतील स्वामी विवेकानंदनगर येथील मैदानात महायुतीच्या नाशिक पश्चिमच्या उमेदवार सीमा हिरे यांच्या प्रचारार्थ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या सभेचे शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आयोजन करण्यात आले होते. सकाळी अकरा वाजेपासून कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. राजे संभाजी स्टेडियमवर मुंडेंचे हेलिकॉप्टर उतरणार होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे सायखेडा येथे त्यांचे हेलिकॉप्टर लँड झाल्याने सभेला तब्बल तीन तास विलंब झाला. अखेर कार्यकत्यांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. दुपारी तीननंतर भोळे मंगल कार्यालयात सभेऐवजी मेळावा झाला. त्यामुळे पदाधिकारी-कार्यकत्यांचा हिरमोड झाला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed