• Sat. Nov 16th, 2024
    हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र नहीं! मविआला पाठिंबा देणाऱ्या नोमानींचा VIDEO शेलारांकडून शेअर

    Ashish Shelar: ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मविआच्या २६९ उमेदवारांना बोर्डाकडून समर्थन देण्यात आल्याची माहिती सज्जाद नोमानी यांनी दिली. याच नोमानी यांचा व्हिडीओ शेलारांनी शेअर केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: विधानसभा निवडणुकीचं मतदान अवघ्या ४ दिवसांवर आलेलं आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात काँटे की टक्कर आहे. गेल्या पाच वर्षांत घडलेल्या अभूतपूर्व घडामोडी पाहता यंदाची निवडणूक उत्कंठावर्धक आहे. भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांत बटेंगे तो कटेंगे घोषणेवर जोर दिला आहे. त्यानुसार प्रचार सुरु केला आहे. त्यानंतर आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओची राजकारणात चर्चा आहे.

    ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मविआच्या २६९ उमेदवारांना बोर्डाकडून समर्थन देण्यात आल्याची माहिती सज्जाद नोमानी यांनी दिली. याच नोमानी यांचा व्हिडीओ शेलारांनी शेअर केला आहे. शेलारांनी व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. शेलारांच्या पोस्टमध्ये मविआच्या चार नेत्यांचा ‘विशेष’ उल्लेख आहे.
    Bacchu Kadu: बच्चू कडूंसोबत गुलिगत धोका; उमेदवाराची अचानक माघार, लढण्यास नकार, करणार दुसऱ्याचा प्रचार
    ‘एक ऐसा व्होट जिहाद करो… जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली… ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची… २ तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. उघडा डोळे, बघा नीट… म्हणूनच एक है तो सेफ है… एक है तो नेक है…’, असं शेलारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचा शेलारांनी व्हिडीओ २१ सेकंदांचा आहे. त्यात ते ‘महाराष्ट्रात यांचा पराभव झाला, तर दिल्लीतलं सरकारदेखील जास्त दिवस टिकणार नाही. आमचं लक्ष्य केवळ महाराष्ट्र सरकार नाहीए, तर केंद्रीय सत्ता, देशाचं भवितव्य आहे,’ असं म्हणताना दिसत आहेत.
    Devendra Fadnavis: ‘त्या’ मुद्द्यावर अजित पवारांसोबत १०० टक्के मतभेद! मतदानाच्या तोंडावर फडणवीस स्पष्टच बोलले
    शेलारांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘कमीत कमी आम्ही पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफच्या बिर्यानी आणि केक खाऊन आलो नाही. आता ज्यांचा व्हिडीओ शेअर केलाय, ते भारताचे नागरिक आहेत. ते काय दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत का? आता हे वोट जिहादावर बोलणाऱ्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्यावर दिल्लीत जाऊन बोलावं. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना मी काडीमात्र किंमत देत नाही. त्यांना मानसिकरित्या मदतीची गरज आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed