• Mon. Nov 25th, 2024
    मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला आग, हेरिटेज रूमसह चार खोल्या जळून खाक, लाखोंचं नुकसान

    नागपूर: शहरातील मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला रविवारी पहाटे ३.३० वाजता भीषण आग लागली. या अपघातात तेथे उभ्या असलेल्या रेल्वेचे सहा डबे जळून राख झाले. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग विझवण्यात आली. मात्र ही आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही.
    शिवीगाळ करू नका, मुलाची पित्याकडे विनंती, बापाचा राग अनावर, संतापात धक्कादायक कृत्य
    शहरातील कडबी चौकात असलेल्या मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला रविवारी पहाटे ३.३० वाजता आग लागली. घटनेची माहिती तातडीने अग्निशमन विभागाला देण्यात आली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र आगीच्या ज्वाला इतक्या तीव्र होत्या की अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी आल्या. सुमारे साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.

    सिंधुदुर्गमधील ३० विद्यार्थ्यांना विषबाधा, MLA नितेश राणे रुग्णालयात, प्राचार्यांना सुनावले खडे बोल

    या आगीत हेरिटेज रूम, ऑफिस आणि स्टोअर रूमसह ऑटोड्रोममध्ये ठेवलेले सामान जळून खाक झाले. या आगीत रेल्वेचे ७५ लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र आग कशी लागली हे अद्याप समोर आलेले नाही. आज नॅरोगेज रेल्वे मार्ग बहुतांश ठिकाणी बंद आहेत. नॅरोगेजच्या आठवण कायम ठेवण्यासाठी हे संग्रहालय २००२ मध्ये सुरू करण्यात आले. या संग्रहालयात परलाखिमुंडी महाराजांचा वैयक्तिक कोच, स्टीम इंजिन, दोन रेल्वे डब्यांमध्ये बांधलेले रेस्टॉरंट, इंग्लंडमध्ये १९०७ मध्ये बांधलेले वाफेचे इंजिन ठेवण्यात आले आहे. त्याचप्रमाणे नॅरोगेज लाईनमध्ये वापरण्यात आलेल्या विविध उपकरणांची आणि त्यावेळची छायाचित्रेही येथे ठेवण्यात आली आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed