• Mon. Nov 25th, 2024
    …तर जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ

    रत्नागिरी: उंटावरून शेळ्या हाकणारा हा मुख्यमंत्री नाही, जनतेच्या सुखदुःखामध्ये धावून जाणारा हा मुख्यमंत्री आहे. जे लोक आता जनसंवाद यात्रा काढत आहेत, पण जर सर्वसामान्य आमदारांजवळ कार्यकर्त्यांजवळ सव्वा ठेवला असता तर आता जनसंवाद यात्रा काढण्याची वेळ आली नसती, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला आहे. कोकणात दापोली येथील आयोजित जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा समाचार घेत जनसंवादयात्रेवरही टीका केली आहे.
    मराठा समाज उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, लोकसभेसाठी चारशे उमेदवारी अर्ज करणार दाखल, समाजाच्या बैठकीत निर्णय
    दरम्यान रामदास कदम यांनी आपल्या भाषणातून व्यथा आणि वेदना व्यक्त केल्या. ही वस्तुस्थिती आहे. आज आम्हाला हा निर्णय का घ्यावा लागला असे सांगत उद्धव ठाकरे यांच्याबद्दल रामदास कदम जे बोलले ती वस्तुस्थिती असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आम्ही शिवसेना भाजप युतीमध्ये निवडून आलो. सरकार युतीचे व्हायला पाहिजे होतं. पण स्वतःच्या स्वार्थासाठी ते उद्धव ठाकरे यांनी केलं नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुनावलं आहे. शिवसेनाप्रमुखांची आम्हाला शिकवण आहे की अन्यायाविरुद्ध पेटून उठा, अन्याय सहन करू नका आणि हेच शिवसेनाप्रमुखांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

    Uddhav Thackeray Slams Amit Shah : अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री, उद्धव ठाकरेंची खोचक टीका

    कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड येथे मिनी एमआयडीसी आणि ५० बेड हॉस्पिटल उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दापोली येथे जाहीर सभेत बोलताना केली. कोकण विकासाला कुठेही कमी पडू देणार नाही, चिपळूण येथील वाशिष्ठी नदीत फुकट जाणारे ६० टीएमसी पाणी ही वापरात आणण्यासाठी आपण काम करत असल्याची माहिती या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास भाई कदम, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार योगेश कदम आदी पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याच पक्षाचा आमदार संपला पाहिजे, यासाठी कोणी काम केलं तर ते उद्धव ठाकरे यांनी केलं, गद्दार असा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा रामदासभाई कदम यांनी जोरदार समाचार घेतला. तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed