• Sat. Sep 21st, 2024

शरद पवारांची खेळी, इच्छुक नेत्यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास, नाराजी दूर करण्याचा नामी उपाय!

शरद पवारांची खेळी, इच्छुक नेत्यांचा एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास, नाराजी दूर करण्याचा नामी उपाय!

सातारा : साताऱ्यातील इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर चक्क स्वतः शरद पवार यांनी साताऱ्याला हेलिकॉप्टर पाठवून इच्छुकांसह आमदार बाळासाहेब पाटलांना मुंबईला बोलावले आहे. या हेलिकॉप्टरमधून राष्ट्रवादीचे बडे चार नेते मुंबईला रवाना झाले. आजच सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत साताऱ्याचा फैसला होईल, असे सांगितले जात आहे.शरद पवार गटाकडून विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, खासदार पुत्र सारंग पाटील की सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांची नावे लोकसभेसाठी चर्चेत आहेत. यापैकी कुणाचं नाव निश्चित होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार गटाकडून सत्यजित पाटणकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी विचारणा झाल्याचे विचारले असता, बाळासाहेब पाटील यांनी राजकीय भाष्य करणं टाळलं.
पश्चिम महाराष्ट्रातील महायुतीचे जागा वाटप ठरले; राष्ट्रवादीला एक तर शिवसेना, भाजपला प्रत्येकी दोन जागा

शरद पवार यांनी चार नेत्यांना एकाच हेलिकॉप्टरमधून प्रवास का घडवून आणला? कारण…

सातारा जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पाटण, उंब्रज, कराड उत्तर, कराड दक्षिण आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विजय निश्चित मेळावे घेण्यात आले. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र या मेळाव्यातील पाटण आणि उंब्रज येथील मेळाव्याच्या बॅनरवर खासदार श्रीनिवास पाटील यांना स्थान दिले नव्हते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील कार्यकर्त्यांमधील धूसफूस बाहेर आली होती. मात्र खासदार श्रीनिवास पाटील गटाकडून याला काही प्रत्युत्तर देण्यात आले नाही. उत्तर कराडचे आमदार बाळासाहेब पाटील यांना विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील हे विकासकामांबाबत विचारात घेत नसल्यामुळे ही नाराजी पसरली असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात होते. या नाराजीतूनच श्रीनिवास पाटील यांना यांचा फोटो बॅनरवर छापणे टाळले होते. यातूनच हा वाद समोर आला होता, असे सांगितले जात होते.
साताऱ्यासाठी सगळेच ‘अ‍ॅक्शन मोड’मध्ये, मविआची साताऱ्यात तर राष्ट्रवादीची मुंबईत बैठक? भाजपही आशावादी

आज साताऱ्यातील इंडिया आघाडीची बैठक अत्यंत हसत खेळत, प्रत्येकाचा विचारविनिमय घेत पार पडली. यामध्ये उमेदवारीचीही चर्चा करण्यात आली. मात्र, नेमका उमेदवार कोण हे सांगण्यास मात्र आघाडीतील ज्येष्ठ नेत्यांनी नकार दिला. लवकरच उमेदवार कळेल, असे त्यांनी सांगितले.

साताऱ्याचा उमेदवार ठरवण्यासाठी बाळासाहेब पाटलांना मुंबईत बोलवलं, शरद पवारांनी थेट हेलिकॉप्टर पाठवलं

बाळासाहेब पाटील गटातील नाराजी दूर करण्यासाठी आणि एकमताने उमेदवार ठरविण्यासाठी मुंबईतील बैठकीला चौघेही नेते एकाच हेलिकॉप्टरमधून रवाना झाले झाली असल्याने त्यांच्यातील दुरावा आता दूर झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसते आहे. मात्र लोकसभा निवडणुकीचा उमेदवार हा ठरवण्यामध्ये बाळासाहेब पाटील यांचा विचार महत्त्वाचा ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed