छत्रपती शिवरायांना प्रणाम करीत सुरुवात
‘भारत आज जो काही आहे त्याचा पाया रचणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचे ऋण आम्ही कधीही विसरू शकणार नाही. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मी प्रणाम करतो’, अशा शब्दांत शहा यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ‘२०२४ची निवडणूक मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी नाही तर आत्मनिर्भर आणि विकसित भारत बनवण्यासाठी आहे, भारताच्या भविष्याची आहे. त्यामुळे तुमचे मत लोकशाही मजबूत करणाऱ्या पक्षाला द्या’, असे आवाहन त्यांनी केले.
‘राहुल यान’ म्हणत घराणेशाहीवरून हल्लाबोल
‘सोनियांना राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे. उद्धव ठाकरे यांना मुलाला, शरद पवार यांना मुलीला, ममता यांना भाच्याला मुख्यमंत्री करायचे आहे. आपल्यासाठी कुणी असेल तर ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी विकसित भारताचे लक्ष्य ठेवल्याचेही शहा म्हणाले. पुढच्या पाच वर्षांत भारताला जगातील तिसरी अर्थव्यवस्था करणार, २०३६ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन करणार तर २०४० मध्ये चंद्रावर भारतीय माणूस उतरविणार व २०४७ मध्ये भारत आत्मनिर्भर करण्याची मोदींची गॅरंटी असून, मोदी चंद्रावर माणूस उतरवायची तयारी करीत असताना सोनिया तिसऱ्यांदा ‘राहुल यान’ लॉन्च करण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे’, अशी खोचक टीकाही शहा यांनी केली.