• Sat. Sep 21st, 2024
राष्ट्रवादी vs शिवसेना वादाचा दुसरा अंक, दादांच्या आमदाराविरुद्ध शिंदेंच्या विश्वासूची तक्रार

धनाजी चव्हाण, परभणी : परभणीमध्ये महायुतीतील अंतर्गत वाद चहाट्यावर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष सईद खान यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री यांनी नेमलेली संजय गांधी निराधार योजना समिती तात्काळ रद्द करण्याची मागणी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ही समिती नियमानुसार नसल्याचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. त्यामुळे परभणीत महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. शिवसेना नेते सईद खान यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही समिती बरखास्त होणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय बनसोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आ. बाबाजणी दुर्राणी यांच्या अध्यक्षतेखाली पाथरी येथील संजय गांधी निराधार योजना समिती स्थापन केली आहे. ही समिती शासन नियमाप्रमाणे नसल्याचे म्हणत आता ही समिती रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी केली आहे.
एक मुख्यमंत्री आलाय, समजून जा; रत्नागिरीसाठी No Compromise, कमळच फुलणार, प्रमोद सावंत आक्रमक
यासंदर्भात सोमवार ४ मार्च रोजी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात खान यांनी म्हटले आहे की, तालुका स्तरावरील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष पदाची निवड पालकमंत्री यांच्या शिफारसीनुसार केली जाते, परंतु त्या शासन निर्णयानुसार संजय गांधी निराधार योजनेचा अध्यक्ष हा सामाजिक कार्यकर्ता असावा, अशी शासन निर्णयामध्ये अट आहे. पण स्थापन केलेल्या समितीमधील अध्यक्ष आ . दुर्राणी हे विधान परिषदेचे सदस्य असून शासनाकडून त्यांना वेतन, भत्ते व इतर सवलती दिल्या जातात. आ. दुर्राणी हे लोकप्रतिनिधी असून सामाजिक कार्यकर्ते नाहीत. त्यामुळे त्यांना या नव्या समितीमध्ये शासन निर्णयाप्रमाणे नियुक्त करता येत नाही.
शिरुरमधून भाजप आमदाराला तिकीट द्या, अजितदादा गटातील इच्छुकाची जबरी खेळी, आढळरावविरोध सुरुच
शिवाय समितीत ज्येष्ठ नागरिक एक सदस्य असावा लागतो, त्याप्रमाणे स्थापन केलेल्या समितीमध्ये ज्येष्ठ सदस्य नसल्याचे दिसून आले आहे, असेही सईद खान यांनी निवेदनात नमूद केले आहे. एकदंरीत समिती शासन निर्णयाप्रमाणे नाही, असे म्हणत दोन ते तीन दिवसांमध्ये पाथरी तालुका स्तरावरील स्थापन केलेली समिती रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या नेत्यांनी तक्रार केली असल्याने आता महायुतीतील वाद समोर आला आहे.

अजित पवारांसोबत दिलीप वळसे पाटील अन् शिवाजीराव आढळराव पाटलांचा एकाच गाडीतून प्रवास

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

यापूर्वी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये वेळोवेळी खटके उडालेले आहेत. राज्यस्तरावर लोकसभेच्या जागांवरून महायुतीतील तीनही पक्षांमध्ये चढाओढ सुरू असताना दुसरीकडे मात्र स्थानिक पातळीवर देखील महायुतीतील घटक पक्ष एकमेकांच्या विरोधात कुरघोड्या करत असल्याचे दिसत आहे. शिवसेनेच्या तक्रारीवरून आता ही समिती बरखास्त होणार का? महायुतीतील वाद मिटणार की पेटणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed