• Sat. Sep 21st, 2024
कोण आहे शिवसेना ठाकरे गटाचे मावळचे उमेदवार संजोग वाघेरे. जाणून घ्या

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये एका कार्यक्रमात मावळमधील उमेदवार थेट जाहीर करून टाकला. शिवसेनेकडून मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झालेले संजोग वाघेरे कोण जाणून घेऊ या..

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या संजोग वाघेरे यांचा २०२३च्या डिसेंबर महिन्यात शिवेसेनेत म्हणजे ठाकरे गटात प्रवेश घडवून आणण्यात आला. डिसेंबरमध्ये संजोग वाघेरे हे ठाकरे गटात आले असले तरी निवडणूक लढण्याची तयारी त्यांनी खूप आधीपासूनच सुरू केली होती.
उद्धव साहेब, तुमच्यासाठी लिफ्ट खाली करु, प्रसाद लाड यांच्या कानपिचक्या; माझा अख्खा पक्ष खाली केलात, ठाकरेंचा टोला

संजोग वाघेरेंना घरात राजकारण तसं जुनं नाही. संजोग यांचे वडील भिकू भिमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावाचे सरपंच होते. नंतरच्या काळात ते महापौर देखील बनले. वाघेरे कुटुंबाचे नाव पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात सन्मानाने घेतले जाते. संजोग वाघेरे हे गेल्या 40 वर्षांपासून पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात ओळखले जाते. नगरसेवकपदापासून सुरू झालेला प्रवासात त्यांनी महापौर, पीसीएमटीचे सभापती, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपदापर्यंत भूषविला. आता त्यांना थेट खासदार होण्याची संधी ठाकरे गटाकडून मिळत आहे.
उद्धव ठाकरेंचं मिशन लोकसभा सुरु, भरसभेत रायगड अन् मावळचे उमेदवार जाहीर,बारणे तटकरेंविरुद्ध कुणाला संधी?

संजोग वाघेरे यांच्या पत्नीसुद्धा पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात अॅक्टीव्ह आहेत. माजी नगरसेवक, स्थायी समितीच्या अध्यक्ष तसेच महापालिकेच्या विविध समित्यांवर त्यांनी पद भूषविले आहे. 2014 आणि 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना संजोग वाघेरे यांना लोकसभेची निवडणूक खुणावत होती. मात्र, 2019 मध्ये अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे मावळ मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने त्यांना ही इच्छा मनातच ठेवावी लागली. त्यावेळी वाघेरे यांनी माघार घेतली होती. मात्र, यावेळी निवडणूक लढण्याचे निश्चित करत त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. यापूर्वी खुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांना उमेदवारीबाबत शब्द दिल्याचे सांगण्यात येत होते. त्यावर आज शिक्कामोर्तब झाले आहे. संजोग वाघेरे पाटील यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed