• Mon. Nov 25th, 2024

    पंकजा मुंडेंनतर भावना गवळींसाठी महादेव जानकरांची बॅटिंग, मुख्यमंत्र्यांसमोर मोठं वक्तव्य

    पंकजा मुंडेंनतर भावना गवळींसाठी महादेव जानकरांची बॅटिंग, मुख्यमंत्र्यांसमोर मोठं वक्तव्य

    पंकज गाडेकर, वाशिम: राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर नेहमी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यासाठी बॅटिंग करताना दिसत असतात. पंकजा मुंडे यांचा भाऊ म्हणून ते कायम त्यांना साथ देत असतात. महादेव जानकर सध्या महायुतीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते एका वक्तव्यानं पुन्हा चर्चेत आले आहेत. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून मंत्री संजय राठोड इच्छूक असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर भावना गवळी यांनी देखील लोकसभा मतदारसंघ सोडणार नसल्याचं म्हटलं होतं. आता थेट महादेव जानकर भावना गवळींच्या मदतीसाठी उभे राहिले आहेत. जानकर यांनी एकनाथ शिंदे यांना यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाची उमेदवार जाहीर करण्याची मागणी केली.खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे तिकीट दिले नाही तर मी त्यांना रासपचं तिकीट देईल, असं महादेव जानकर म्हणाले. खासदार भावना गवळी या रासपच्या तिकिटावर यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढतील आणि त्या निवडून येतील असा थेट इशारा रासपचे नेते महादेव जानकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला. शिवसेनेच्या वतीने आयोजित वाशिम येथील महिला मेळाव्यात ते बोलत होते. महादेव जानकर यांनी यावेळी थेट भावना गवळींच्या उमेदवारीसाठी बॅटिंग केल्यानं नव्यानं चर्चा सुरु झाली आहे. आता एकनाथ शिंदे कुणाला उमेदवारी देतात हे पाहावं लागणार आहे.
    Read Latest Maharashtra News And Marathi News
    शिंदे, फडणवीस आऊट; मोदींच्या स्वागताच्या बॅनरवर एकट्या भावना’ताई’; लोकसभेला मिळणार ‘ओवाळणी’?

    शिक्षक आमदार किरण सरनाईक यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

    अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे अपक्ष आमदार अॅड. किरण सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यासाठी आले असता अपक्ष शिक्षक आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. शिक्षक आमदार किरण सरनाईक हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आतेभाऊ असून त्यांनी केलेल्या शिवसेनेत केलेल्या पक्ष प्रवेशामुळे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मोठा धक्का मानला जात आहे.
    महायुतीच्या जाहिरातीतून गवळी गायब; मोदींची बहीण म्हणते, शिंदेंसोबत गेलो तेव्हाच सगळं…

    लोकनाथचे फलक चर्चेत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज वाशिम मध्ये सभा पार पडली. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भावना गवळी यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी हजारो महिला हातात फलक घेऊन सभेला उपस्थित होत्या. यावेळी यातील एका महिलेच्या हातातील फलकावर ”दिलेला शब्द पाडणारा नेतृत्व म्हणजे लोकनाथ” अश्या आशयाचे फलक झळकत होते.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed