• Sat. Mar 7th, 2026

    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची ९ मार्च रोजी विशेष मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 7, 2026
    आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अश्विनी भिडे यांची ९ मार्च रोजी विशेष मुलाखत – महासंवाद

    मुंबई, दि. ७: “आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या” निमित्ताने पायाभूत सुविधा क्षेत्रात महिलांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव तसेच मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसीएल) व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.

    मुंबईत नुकताच पूर्ण झालेला भारतातील सर्वात लांब भूमिगत मेट्रो प्रकल्प ‘मेट्रो 3 (कुलाबा-वांद्रे-सीप्झ)’ हा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प ठरला आहे. अभियांत्रिकी कौशल्य, सातत्य आणि अचूक नियोजनाच्या जोरावर या प्रकल्पाने अनेक अडथळ्यांवर मात करत यशस्वी वाटचाल केली. या प्रकल्पाच्या पूर्ततेदरम्यान आलेले अनुभव, तांत्रिक अडचणी आणि त्यावर केलेल्या प्रभावी उपाययोजनांबाबत अश्विनी भिडे यांनी या मुलाखतीत सविस्तर माहिती दिली आहे.

    आपल्या 25 वर्षांच्या सेवाकाळातील कार्याचा आढावा घेताना त्यांनी मुंबईच्या पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाच्या उभारणीपासून ते अरबी समुद्रालगतच्या कोस्टल रोड प्रकल्पापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना आलेले अनुभव सांगितले. पायाभूत सुविधा क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांना “मुंबई मेट्रो वूमन” अशी ओळख मिळाली असली तरी, “ही माझी नव्हे तर संपूर्ण टीमची ओळख आहे,” असे त्या नम्रपणे नमूद करतात. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने महिलांनी पायाभूत सुविधा आणि अभियांत्रिकीसारख्या क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने पुढे यावे, असा संदेशही त्यांनी दिला आहे.

    ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही विशेष मुलाखत सोमवार ९ मार्च २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर प्रसारित होणार आहे. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

    Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

    YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed