• Mon. Nov 25th, 2024

    लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, मविआमध्ये जागा नेमकी कुणाकडे जाणार

    लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेचा तिढा सुटला, मविआमध्ये जागा नेमकी कुणाकडे जाणार

    कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रात महत्त्वाचा असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर महाविकास आघाडीतील तिन्ही प्रमुख पक्षांनी दावा केला होता. यामुळे ही जागा कोणाला द्यायची यासंदर्भात महाविकास आघाडी मधील तिढा सुटत नव्हता. यामुळे या वादावर तोडगा काढण्यासाठी महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती. भेटी नंतर आता हा तिढा सुटण्याच्या मार्गावर असून ही जागा शिवसेना ठाकरे गटाने काँग्रेसला सोडण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती समोर आली आहे. तर या जागेवर काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी द्यायचे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र या बदल्यात काँग्रेसकडून सांगलीची जागा शिवसेनेला सोडण्यावर एकमत झालं असल्याचं ही सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

    जागा सोडण्यास शिवसेना ठाकरे गट तयार :

    राज्याच्या राजकारणात झालेल्या राजकीय भूकंपानंतर २०२४ ची लोकसभा निवडणूक ही दिवसेंदिवस रंजक होत चालली आहे. अनेक राजकीय समीकरण बदलल्याने महाविकास आघाडी मध्ये जागा वाटपावरून तिढा सुटत नाहीय. पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ असलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला होता. मात्रस शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरी नंतर विद्यमान खासदार हे शिंदे गटासोबत गेले. यामुळे या जागेवर शिवसेनेने आपला दावा केला होता. मात्र या जागेवरून शाहू महाराज छत्रपती यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी काँग्रेस देखील आग्रही होती. तर शिवसेना ठाकरे गटाने छत्रपती शाहू महाराज यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होता.
    कोल्हापूर लोकसभेसाठी शाहू महाराजांचे नाव आघाडीवर; संभाजीराजेंची इन्स्टाग्रामवर सूचकं स्टोरी, चर्चेला उधाण
    या जागेवरून काँग्रेस शिवसेना ठाकरे गट या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. तर पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जागांवर काँग्रेसनं दावा सांगितल्याने शिवसेना ठाकरे पक्षात नाराजी पसरली होती. कोल्हापूर शिवसेनेला देण्यात आलं नाही तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्रात एकही सभा न घेण्यावर ठाम असल्याचा इशाराही देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली होती. मात्र या जागेवरून शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे. कोल्हापूरची जागा सोडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने तयारी दर्शवली असून या जागेवरून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. मात्र, ही उमेदवारी काँग्रेसच्या कोट्यातून जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
    Read Latest Maharashtra News And Marathi News
    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून मोठी बातमी; तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल- श्रीमंत शाहू महाराज छत्रपती

    कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीची जागा :

    शिवसेनेने कोल्हापूरची जागा सोडण्याच्या बदल्यात सांगलीची काँग्रेसची जागा मागितली आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून २०१४ आणि २०१९ साली भाजपच्या संजय काका पाटील यांनी विजय मिळवत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतिक पाटील व विशाल पाटील यांना पराभूत केलं होतं. यानंतर प्रतिक पाटील यांनी राजकारणातून संन्यास घेतला तर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनीही २०१९ साली आघाडीमध्ये काँग्रेसने सांगलीची जागा स्वाभिमानीसाठी सोडल्याने काँग्रेस ऐवजी स्वाभिमानी शेतकरी पक्षातून निवडणूक लढली होती. विशाल पाटील यांनी लोकसभेची तयारी केलेली आहे. त्या मुळे काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये झालेल्या जागा अदलाबदली नंतर कोल्हापूरची जागा ही काँग्रेसलाच जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, शरद पवार यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी शाहू महाराज यांची भेट घेतली होती. यामुळे शरद पवारांनी काही खेळी केल्यास ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे जाणार हे पाहाावं लागेल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed