• Sat. Sep 21st, 2024

यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते साताऱ्याची लोकसभा,राष्ट्रवादीचे सातारा कार्याध्यक्ष म्हणाले

यशवंतराव चव्हाणांना भारतरत्न ते साताऱ्याची लोकसभा,राष्ट्रवादीचे सातारा कार्याध्यक्ष म्हणाले

संतोष शिराळे, सातारा : देशाचे उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पार पाडल्या आहेत. त्यांचे सामाजिक, राजकीय आणि वैचारिक योगदान लक्षात घेवून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अमित कदम यांनी दिली.सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कदम म्हणाले, दिवंगत यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राच्या राजकारणातील ध्रुवतारा आहेत. त्यांच्या विचाराचे वारसदार अनेक राजकीय पक्षात सामाजिक, राजकीय जवाबदारीने काम करीत आहेत. त्यांच्यासारख्या बहुजन समाजाचे हित जोपासणाऱ्या महान नेत्याचा गौरव व्हावा, अशी सर्वांची भावना आहे. त्यामुळे त्यांच्या सर्व वैचारिक वारसदारांना एकत्रित करून यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्काराबाबत सामूहिक प्रयत्न करून करण्यात येणार आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News
शिरुरमधून भाजप आमदाराला तिकीट द्या, अजितदादा गटातील इच्छुकाची जबरी खेळी, आढळरावविरोध सुरुच
यशवंतराव चव्हाण यांची १११ वी जयंती १२ मार्च रोजी आहे. त्यानिमित्त जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्व. यशवंतराव चव्हाण साहेब विचार जयंती सप्ताह दि. ०७ ते १२ या कालावधीमध्ये साजरा करण्याचे ठरविले आहे. या कालावधीत स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांचे विचार व कार्य यांचा प्रसार व्हावा तसेच यांनी महाराष्ट्रासाठी व देशासाठी जे योगदान दिले आहे. याची माहिती नवीन पिढीला माहिती व्हावे म्हणून सप्ताहाचे आयोजन केले असल्याचे कदम यांनी सांगितले.
आणखी एक सोडचिठ्ठी-बसवराज पाटील

संधी मिळाली, तर निवडणुकीच्या रिंगणात

नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीतील घटक पक्ष एकत्र आले आहेत. सातारा लोकसभा मतदारसंघ कोण लढणार हे जागा वाटपात अजून ठरले नाही. पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे जागा असावी, अशी आमची भावना आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली, तर मिळालेली जबाबदारी स्वीकारणार आहे, असं अमित कदम म्हणाले आहेत.
हिंगोली मावळवर भाजपचा दावा, महायुतीत जागावाटपावरुन संघर्ष? दक्षिण मुंबईत देवरांसह यशवंत जाधवांचं नाव चर्चेत
दरम्यान, अजित पवार यांनी कर्जत येथील अधिवेशनात साताऱ्याच्या जागेवर दावा सांगितला होता. अजित पवारांच्या गटातून जिल्हा बँकेचे चेअरमन नितीनकाका पाटील यांचं नाव चर्चेत होतं आता त्यात अमित कदम यांची भर पडली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed