६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण
आता ६ तारखेपर्यंत सारं काही सुरळीत होईल, या वडेट्टीवारांच्या वक्तव्याबद्दल माहीत नसल्याचं आंबेडकर म्हटले आहे. कारण त्यांच्यातील १५ जागांवरचा तिढा सुटला तर पुढे पाहू. जर एकटं लढलो तर आमची लढत भाजपसोबत असणार आहे. परंतु अजूनही आम्ही महाविकास आघाडीत आहो, याबद्दल आम्हालाही संभ्रम आहे. असेही ते म्हटले. अजूनही महाविकास आघाडीच्या बैठकीचं पुढचं निमंत्रण नाहीये. मात्र, ६ मार्चला शरद पवारांकडून भेटीचं निमंत्रण आलं आहे. पण भेटीचं स्थळ अद्याप ठरलं नाहीये. नक्कीच ही भेट मुंबईच्या बाहेर असणार असल्याचे ते म्हटले.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या वंचितसोबत चर्चा, बैठका सुरू आहेत. पण जागावाटपाचा तिढा कायम आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत येतील असा ठाम विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना वंचितनं तीन उमेदवार जाहीर केलेय. दरम्यान वर्ध्याच्या जिल्हा कार्यकारिणीने तिथल्या उमेदवाराची शिफारस केली अद्याप पक्षाने निर्णय घेतला नाही. चंद्रहार पाटलांच्या उमेदवारीवर ८ तारखेला अंतिम निर्णय जाहीर करणार असल्याचे आंबेडकर म्हटले.
अकोल्यातून प्रकाश आंबेडकर, तर वंचितकडून खात्रीलायक मिळालेल्या माहितीवरुन, वर्ध्यातून राजेंद्र साळुंखे आणि सांगलीतून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नावांची घोषणा होणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत २०१९चा पॅटर्न रिपीट होण्याची चिन्हं आहेत. गेल्या निवडणुकीत वंचितनं स्वबळ आजमावलं. त्यावेळी त्यांची काँग्रेसशी बोलणी फिस्कटली होती. वंचितच्या ”एकला चलो रे”चा फटका दोन्ही काँग्रेसला बसला. सहा मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादी, स्वाभिमानीचे उमेदवार पडले. महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी लोकसभेच्या तीन जागांसाठी उमेदवार घोषीत करणे. मविआसोबत युती करण्याची बोलणी अद्याप पूर्ण झालेली नाहीत.
मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यात येऊन लढावं
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाणारसीतून लढणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर, आपण पंतप्रधान मोदींविरुद्ध लढणार का? असे आंबेडकर यांना माध्यमाने प्रश्न विचारला असता त्यावर त्यांनी म्हटलं. मी अकोल्यातूनच लढणार. मोदींनी माझ्याविरोधात अकोल्यात येऊन लढावं.
त्या अधिकाऱ्यांना आंबेडकरांचा इशारा
अजित पवार संदर्भात आंबेडकर बोलताना म्हणाले की घोटाळा झालेला आहे, हे बरोबर आहे. त्यातले अधिकारीही पुढे आले आहेत. जर सत्ता बदल झाल्यास, कायदेशीर कारवाई करण्यासाठी, असा आग्रह आमचा पक्षाचा राहणार. अजित पवारांबद्दल चौकशी आणि कारवाई गांभीर्याने झाली पाहिजे. अधिकाऱ्यांनी आता फक्त आमची सत्ता येऊ नये एवढं बघावं.
दरम्यान, सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या लढतीसंदर्भात बोलतांना म्हटले की बारामतीत शरद पवारांचा नवीन पिढीसोबतचा रॅपो कसा असेल, यावर तेथील लढतीचं चित्र अवलंबून असणार आहे.