• Mon. Nov 25th, 2024
    आढळरावांना पक्ष प्रवेश दिला तर…; मोहिते पाटील स्पष्टच बोलले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गुंता वाढला

    पुणे : शिरूर लोकसभेच्या जागेबाबत अजित पवारांचं दिवसेंदिवस टेन्शन वाढत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार शिवाजी आढळराव पाटील यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांमुळे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी नाराजी जाहीरपणे बोलू दाखवली तर आहेच. पण बाकीचे चारपैकी तीन आमदारही या निर्णयावर नाखुश असल्याची चर्चा दबक्या आवाजात चालू आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपेक्षापेक्षा वेगळा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ”मी २० वर्ष आढळराव पाटलांविरोधात संघर्ष करत आहे. आढळरावांना जर पक्ष प्रवेश दिला तर बाकी आमदार नाराज होतीलच तसेच मला देखील वेगळा निर्णय घ्यावा लागेल”, असं मोहिते पाटील म्हणाले आहेत.शिरूर लोकाभा मतदारसंघात अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचं चॅलेंज दिलं आहे. तर शरद पवार यांनी मतदारसंघावर स्वत: लक्ष घालत अमोल कोल्हेंचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी शिरूर लोकसभा निवडणूक ही प्रतिष्ठेची झाली आहे.
    अजितदादा म्हणतील PMC कशाला, खातंच द्या; पण ते देणार नाही, माझ्याकडेच ठेवेन, फडणवीसांची कोपरखळी
    शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांचे जुने निकटवर्तीय प्रदीप कंद यांना पक्ष प्रवेश देऊन उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. परंतु प्रदीप कंद यांनी उत्सुकता दाखवली नाही, म्हणून पुन्हा आढळराव पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली. अजित पवारांच्या चिन्हावर लढवण्याची तयारीही आढळराव पाटील यांनी केली आहे. परंतु तोच पेच आता अजित पवारांपुढे वाढला आहे. मोहिते पाटील यांनी वक्तव्य करत आढळराव पाटील यांचा विरोध केला आहे. ”मी २० वर्ष आढळराव पाटलांविरोधात संघर्ष करत आहे. आढळरावांना जर पक्ष प्रवेश दिला तर बाकी आमदार नाराज होतीलच तसेच मला देखील वेगळा निर्णय घ्यावा लागेल”, असं मोहिते पाटील म्हणाले आहेत.

    शिवाजी आढळराव पाटील यांनी २००४ मध्ये राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनामध्ये प्रवेश केला. दरम्यान, ते लोकसभा निवडणूका लढवत खासदारही झाले. त्यानंतर त्यांनी मतदारसंघात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले. मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या बाजार समितीमध्ये हस्तक्षेप करायला सुरवात केली. बाजार समितीच्या निवडणुकांमध्येही विरोधात उमेदवार देणे, तसेच घेतलेल्या निर्णयाचा विरोध करणे आणि विधानसभा निवडणुकीला विरोधात उमेदवार देऊन त्याचा प्रचार, अशा बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. त्यासोबत मोहिते पाटील यांचं वर्चस्व असलेल्या चाकण एमआयडीसीमध्ये हस्तक्षेप करायला सुरवात केली. हा वाद अनेक दिवस सुरू होता. त्यामुळे मोहिते पाटील हे आढळराव पाटलांचा विरोध करत आहे. असाच प्रकार दिलीप वळसे पाटलांसोबतही घडला आहे.

    शिरूर लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर मोहिते पाटील यांच्यासोबत दिलीप वळसे पाटील यांचा विरोध असेलच आणि अतुल बेनके हे अमोल कोल्हे यांचे जवळचे मित्र म्हणले जातात. त्यामुळे बेनके कितपत मदत करतील ही शंका आहे. तसेच अशोक बापू पवार यांचा शरद पवारांना पाठींबा आहे आणि चेतन तुपे यांच्याबाबत संभ्रम कायम आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *