• Mon. Nov 25th, 2024

    अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?

    अजित पवारांची चूक फडणवीसांनी सावरली, नंतर दादांनी हात जोडत मानले आभार, नेमकं काय घडलं?

    पुणे: पुण्यात आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यात बारामती येथील नमो रोजगार मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे उद्घाटन कार्यक्रम हवेली तालुक्यातील तुळापूर येथे सुरू आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे भाषणादरम्यान छत्रपती संभाजी महाराज हे त्यांच्या काळात एकही लढाई हरले नाही असे म्हणायच्या ऐवजी एकही “निवडणूक” हरले नाही, असे म्हणाले. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर अजित पवार यांनी निवडणुकीचा काळ असल्याने लढाईऐवजी निवडणूक म्हणालो असल्याने दिलगिरी व्यक्त केली. मात्र यावेळी एकच हशा पिकला असल्याचे पहायला मिळाले.
    आढळरावांना पक्ष प्रवेश दिला तर…; मोहिते पाटील स्पष्टच बोलले, शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गुंता आणखी वाढला
    छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमिपूजन आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडले. त्या अगोदर या तिघांनी वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर तुळापूर येथे कार्यक्रमासाठी दाखल झाले. यावेळी अजित पवार यांनी भाषण करताना छत्रपती संभाजी महाराज एकही लढाई हरले नाही असे म्हणण्याऐवजी छत्रपती संभाजी महाराज एकही निवडणूक हारले नाही, असे बोलून गेले. मात्र ही चूक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून हा निरोप त्यांच्यापर्यंत पोहचवला आणि अजित पवारांची चूक लक्षात आणून दिली.

    मुख्यमंत्री आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांना बोलवून समज देतील | संजय शिरसाट

    यावेळी अजित पवार म्हणाले की, सद्या निवडणुकीचा काळ सुरू आहे. त्यामुळे नुसती डोक्यात निवडणूक आहे. त्यामुळे मी लढाई ऐवजी निवडणूक असे बोलून गेलो. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही चूक लक्षात आणून दिली. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना हात जोडत दिलगिरी व्यक्त केली. अशाच चूका सांगत चला, असे देखील अजित पवार फडणवीसांना म्हणाले. मात्र या गोष्टीने चांगलाच हशा पिकला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed