• Mon. Nov 25th, 2024
    शिंदेंच्या आणखी एका जागेवर भाजपचा दावा, आप्पांची हॅट्रिक हुकणार? थेट दिल्लीत सेटिंग!

    पुणे : गेल्या दहा वर्षापासून मावळ लोकसभेचं प्रतिनिधित्व शिवसेनेचे श्रीरंग आप्पा बारणे करत आहेत. आता शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा या जागेवर दावा आहे. दुसरीकडे श्रीरंग आप्पांची निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्याच आलेली असताना भाजपने देखील या जागेवर दावा ठोकला आहे. त्यामुळे सद्या शिंदेंच्या शिवसेनेत असलेले खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बारणे यांना हॅट्रिक करता येते का हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे असणार आहे.भाजप कोअर कमिटीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत भाजपने मावळ लोकसभेची जागा लढवावी, असा आग्रह पदाधिकाऱ्यांकडून झाला. मावळ लोकसभा मतगदारसंघात आपली जास्त ताकद आहे तसेच पक्ष संघटना देखील मजबूत असून ठिकठिकाणी बूथ उभारून पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू आहे. तसेच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायतीत भाजपाचीच सत्ता आहे.
    धैर्यशील माने, थांबता का बघा; सदाभाऊ खोत यांचं जाहीर आवाहन; बावनकुळे म्हणाले, फडणवीसांचाही तुम्हालाच पाठिंबा

    दुसरीकडे भाजप घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधत आहे. त्या तुलनेत शिंदेंच्या शिवसेनेची ताकद कमी आहे. पक्ष संघटना कमकुवत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा अनेक गोष्टींमुळे भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी मावळमध्ये भारतीय जनता पक्षानेच लढावं, अशी मागणी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मात्र भाजपच्या कर्जत येथे झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आली असून वरिष्ठ आता याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. याबाबत श्रीरंग बारणे यांनी सर्व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोडले आहे.
    पक्षाने जर आढळरावांना प्रवेश दिला तर… अजितदादांच्या आमदाराने आपला ‘निर्णय’ सांगितला!

    मावळच्या जागेसाठी भाजपचे अनेक पदाधिकारी दिल्लीत तळ ठोकून असल्याचे बोलले जात आहे. कारण मावळची भाजपनेच लढावी यासाठी अनेक दिग्गज नेते दिल्लीत तळ ठोकून बसले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात मावळची जागा कुणाकडे जाते आणि श्रीरंग आप्पा मावळची हॅट्रिक करतात का? की शिंदे यांच्या खासदाराला तिकीट नाकारून भाजप आपला उमेदवार देते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed