नवी मुंबई : ‘इंटेल’ या कंपनीच्या ९०च्या दशकातील ‘पेंटियम’ या संगणक प्रोसेसरच्या निर्मितीप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी (वय ६८) यांचा नवी मुंबईतील पामबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला. सायकलस्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलीला मागून भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने धडक दिली. अवतार सैनी हे चेंबूर-खारघर-खोपोली अशी सायकलस्वारी नियमितपणे करत असत. ते आपल्या चमूसह जात असताना पामबिच मार्गावर बेलापूरनजीक महापालिका मुख्यालयासमोर त्यांच्या सायकलचा अपघात झाला. या दुर्घटनेत सैनी यांचा जागीच मृत्यू झाला.मायक्रोप्रोसेसरच्या रचनेशी संबंधित सात पेटंट अवतार सैनी यांच्या नावावर आहेत. २००४मध्ये ते इंटेलच्या दक्षिण आशिया विभागाच्या संचालकपदावरून निवृत्त झाले आणि भारतात स्थायिक झाले होते.
‘इंटेल’ कंपनीच्या ९०च्या दशकातील ‘पेंटियम’ या संगणक प्रोसेसरच्या निर्मिती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणारे अवतार सैनी ह्यांचा वयाच्या ६८ व्या वर्षी नवी मुंबईतील पामबिच मार्गावर अपघाती मृत्यू झाला आहे. सायकलस्वारी करत असताना सैनी यांच्या सायकलीला मागून भरधाव वेगाने आलेल्या टॅक्सीने जोरदार धडक दिली. आणि अवतार सैनी हे जागेवर खाली पडले.
या घटनेबाबत एनआरआय पोलीस ठाण्यात टॅक्सी चालक ऋषिकेश खाडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेच्या रखडलेल्या सायकल ट्रॅकमुळे अवतार सैनि यांचा बळी गेल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामाची ही पोलखोल पुन्हा एकदा समोर आलेली आहे. पामबीच रोड लगत बांधण्यात येत असलेला सायकल ट्रॅक चुकीच्या नियोजनामुळे रखडल्याने अवतार सैनी यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा सध्या नवी मुंबई मध्ये रंगली आहे.