• Sat. Sep 21st, 2024

गुड न्यूज, म्हाडाची मराठवाड्यात सोडत, ९४१ घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया, जाणून घ्या

गुड न्यूज, म्हाडाची मराठवाड्यात सोडत, ९४१ घरांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया, जाणून घ्या

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: म्हाडाने येथील विभागीय कार्यालय क्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा, लातूर, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी आणि धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत असलेल्या ९४१ सदनिका, ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. यात अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रियेच्या कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी म्हाडाच्या विभागीय कार्यालयात झाला.म्हाडाचे मुख्याधिकारी मंदार वैद्य यांच्या हस्ते या सोडत कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी निवृत्त न्यायाधिश शेटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा सूचना अधिकारी थोरात, उपमुख्याधिकारी जयकुमार नामेवार, बँक ऑफ महाराष्ट्रच्या मुख्य व्यवस्थापक गुरुप्रीत कौर कांबो उपस्थित होते. सदनिका विक्री सोडतीची लिंक २७ मार्च, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत कार्यरत असेल. २७ मार्च रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करू शकतील. २८ मार्चला संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आरटीजीएस / एनईएफटी द्वारे अनामत रकमेचा भरणा करता येईल.. सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारूप यादी ४ एप्रिल रोजी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर प्रसिद्ध होईल. तर १२ एप्रिल रोजी अंतिम पात्र अर्जाची यादी जाहीर होणार असून, सोडतीचे स्थळ व दिनांक नंतर कळविण्यात येईल, असे म्हाडाने नमूद केले.
Read Latest Maharashtra News And Marathi News
अमृत भारत योजनेतून ५५४ कोटींचा निधी, मुंबईतील २० रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार, वाचा यादी

सोडत तीन घटकांमध्ये

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली सोडत तीन घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २३३ सदनिकांचा समावेश आहे. २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत एकूण २९८ सदनिका व ५२ भूखंड उपलब्ध असणार आहेत. तसेच छत्रपती संभाजी नगर मंडळाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४१० सदनिका व ३०९ भूखंडांचा समावेश आहे.
Mhada Lottery: म्हाडाकडून Dream Home घेण्याची सुवर्णसंधी, कोकण विभागातील ५००० घरांची लॉटरी जाहीर

शरद पवारांनी लोकसभेची ऑफर दिलीय का?, पत्रकारांनी प्रश्न विचारला, शाहू महाराज छत्रपतींनी सांगून टाकलं

दलालांच्या प्रलोभनांना बळी पडू नये

नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाइन व पारदर्शक आहे. कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेपास संधी नाही. सदनिकांच्या विक्रीसाठी मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ, दलाल, मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. असे म्हाडाचे नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed