• Sat. Sep 21st, 2024

किस्सा कुर्सी का! सभा मोदींची अन् मंडपातील खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे; प्रकार घडला कसा?

किस्सा कुर्सी का! सभा मोदींची अन् मंडपातील खुर्च्यांवर फोटो राहुल गांधींचे; प्रकार घडला कसा?

यवतमाळ: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळ दौऱ्यावर येणार आहेत. महिला बचत गटाच्या मेळाव्याला ते उपस्थित राहतील. या कार्यक्रमात मोदी दोन लाखांहून अधिक महिलांना संबोधित करतील. मोदींच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षासह शिंदेंच्या शिवसेनेनंही जोरदार तयारी केली आहे.

पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी स्थानिक खासदार भावना गवळींनी लावलेल्या स्वागताच्या पोस्टरची काल बरीच चर्चा झाली. त्यांच्या होर्डिंगवर पंतप्रधान मोदी आणि भावना गवळी यांचे फोटो होते. गवळींनी त्यांच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो टाळले होते. त्यामुळे गवळींच्या नाराजीची चर्चा झाली. गवळी पाच टर्म खासदार आहेत. यंदा त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसल्यानं गवळी नाराज असल्याचं कळतं.
संपूर्ण देशाची दिशाभूल, केंद्राकडून डोळेझाक; सुप्रीम कोर्टानं पतंजलीसह मोदी सरकारलाही झापलं
आता चर्चा सभास्थळी असलेल्या खुर्च्यांची
खासदार भावना गवळींच्या बॅनरनंतर आता मोदींच्या सभास्थळी असलेल्या खुर्च्यांची चर्चा सुरू झाली आहे. मोदींच्या सभसाठी यवतमाळमध्ये तब्बल ९ लाख चौरस फुटांवर मंडप उभारण्यात आला आहे. या ठिकाणी लाखो खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. यातील बऱ्याच खुर्च्यांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे फोटो आहेत. ते पाहून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
उद्धव साहेब, तुमच्यासाठी लिफ्ट खाली करु, प्रसाद लाड यांच्या कानपिचक्या; माझा अख्खा पक्ष खाली केलात, ठाकरेंचा टोला
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधींची नागपुरात सभा झाली. त्यावेळी वापरण्यात आलेल्या खुर्च्या कंत्राटदारानं यवतमाळमध्ये होत असलेल्या सभेसाठी पाठवल्या होत्या. त्यांनी खुर्च्यांवर लावलेले राहुल गांधींचे फोटोंचे स्टिकरदेखील काढलेले नाहीत. त्यामुळे मोदींच्या सभेला असलेल्या खुर्च्यांवर राहुल गांधींचे स्टिकर आणि त्यावर स्कॅन टू डोनेट असं आवाहन आहे. या खुर्च्यांची सध्या परिसरात चर्चा आहे. मोदींची सभा ४ वाजता होणार आहे. त्याआधी या खुर्च्यांवरील स्टिकर काढले जाणार का, ते पाहणं महत्त्वाचं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed